Akola News Saam Tb
महाराष्ट्र

कचरा वेचक मुलांसाठी निवासी उपजिल्हाधिकारी बनले दूत; अकाेल्यात अभिनव उपक्रम

अभिनव उपक्रमाचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - रस्त्यावरील आणि डंपिंग ग्राउंडवरील (Dumping Ground) कचरा वेचणारी मुले असो की भीक मागून पोटाची खळगी भरणारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे (Sanjay Khadse) यांच्या नेतृत्वात एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे दरम्यान, कचरा वेचणाऱ्या मुलांसह त्यांच्या आई-वडिलांना शिक्षणा (Study) संदर्भात मार्गदर्शन देत, अनेक चिमुकल्यांना शिक्षणाची वाट दाखवली आहे. तर शिक्षणाचा ब्रेक लागलेल्या मुलांनाही पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा अटल प्रयत्न खडसे हे करीत आहे. त्यांच्या अभिनव उपक्रमाचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील पाहा -

कचरा वेचून उदरनिर्वाह करणारी असो की भीक मागून पोटाची खळगी भरणारीअशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचं काम अकोला जिल्ह्यात सुरु झाल आहे. कारण अशा मुलांनी परिस्थितीअभावी शिक्षणाचा मार्ग सोडला आहे तर अनेक जण शिक्षणाची पायरी चढली नाही अशा मुलांचा शोध घेत त्यांना शिक्षणाची वाट दाखवण्याचे मार्ग जिल्ह्यात केलं जात आहे. दरम्यान, अकोल्याच्या नायगांव परिसरात डम्पिंग ग्राउंड असून इथं शहरातील पूर्ण कचरा टाकला जातो. अनेक गोरगरीब कुटुंब आणि त्यांची मुले या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून वस्तू शोधून 'त्या' विकून काही पैसे कमावतात.

या परिसरात काल निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह महिला व बालकल्याण समितीचे मरसाळे, महसुल विभाग आणि त्यांचं पथक नायगावात दाखल झाले. मात्र मुलं त्यांना पाहून पळाले, पण हे पथक त्यांच्या घरापर्यंत पोहचले आणि त्यांच्या कुटुबांसह मुलांना शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. तिथेच त्यांची शिक्षणाविषयी विचारपूस केली, मात्र परिस्थितीमुळे आम्ही शिक्षण सोडले असं या मुलांचं उत्तर होतं. आता त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने पुन्हा मुले शिक्षणाच्या प्रवाहात जाणार आहे.

दहा ते बारा मुलांची शिक्षणासाठी तयारी....

कचरा वेचणारे, बालमजूर, भिक मागणाऱ्या मुलांना सुरक्षित व आनंददायी बालपण मिळावं, यासाठी आवश्यक पाऊले उचलले जाणार आहे. सद्यस्थितीत कचरावेचक दहा ते बारा मुले शिक्षणासाठी पुढे आलेत लवकरचं त्यांना योग्य शाळा, उपयुक्त शालेय वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार. म्हणजेचं या मुला-मुलींना शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहे, असे संजय खडसे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT