Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

...तर लॉकडाऊनबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील, उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

राज्यात रुग्ण संख्या अशीच वाढायला लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं अजित पवार म्हणाले.

ओंकार कदम

सातारा : राज्यात रुग्ण संख्या अशीच वाढायला लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. ते साताऱ्यात बोलत होते. (Deputy CM Ajit Pawar says if corona cases increases then govt should take decision about lockdown)

पश्चिमबंगालमध्ये सुद्धा संख्या वाढायला लागल्यावर लॉकडाऊन केला आहे. देशातील काही राज्यांमध्येसुद्धा असे निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी साता-यात केलंय. त्यामुळे आता लॉकडाऊन होणार की काय अशी चर्चा होऊ लागलीये.

हेही वाचा -

महाराष्ट्रात 11,877 नवीन रुग्ण

रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 11,877 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही शनिवारच्या तुलनेत 2,707 अधिक आहे आणि तर ओमिक्रॉनचे 50 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 1,41,542 वर पोहोचली आहे. आता महाराष्ट्रात 42,024 सक्रिय रुग्ण आहेत. संसर्गाच्या 11,877 प्रकरणांपैकी मुंबईत 7,792 रुग्ण आढळले आहेत.

तर मुंबईत (Mumbai) कोरोनाचे 8,063 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई विभागात संसर्गाची 10,394 प्रकरणे होती, जी राज्यातील एकूण रुग्णांपैकी 90 टक्के आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

SCROLL FOR NEXT