dengue, buldhana File Photo
महाराष्ट्र

Dengue Outbreak In Buldhana : बुलढाण्यात डेंग्यूचा कहर, चिखलीत सर्वाधिक रुग्णांची नाेंद

नागरिकांनी दुखणं अंगावर काढू नये असे आवाहन आराेग्य विभागाने केला आहे.

संजय जाधव

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा डेंग्यूचा कहर वाढू लागल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात ७१ रुग्णांची नाेंद असून सर्वाधिक २० रुग्ण हे केवळ चिखली गावात नाेंदवली गेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील वातावरणात बदल झाल्याने सर्दी खोकला ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सरकारीसह खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (Maharashtra News)

अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढल्याने बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूचे ७१ रुग्ण आढल्याची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या अधिक असू शकते. यापैकी सर्वाधिक म्हणजे २० रुग्ण हे केवळ चिखली तालुक्यातील आहेत.

त्यामुळे हिवताप विभागाकडून तुंबलेल्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडले जात आहेत. नागरिकांनी तुंबलेले पाणी धावते करावे किमान एक दिवस तरी कोरडा पाळावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शिवराज चौहान यांनी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT