परदेशातील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या वाढवा - आठवलेंना पत्र संजय जाधव
महाराष्ट्र

परदेशातील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या वाढवा - आठवलेंना पत्र

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये खर्च होतो. एवढा खर्च झेपावणे शक्य होत नसल्याने विद्यार्थी खुप हुशार असून सुद्धा फायदा होत नाही.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : परदेशात शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थी संख्येची मर्यादा वाढवावी जेणेकरून जास्त विद्यार्थी अमेरिका, लंडन सारख्या देशात उच्च शिक्षण घेतील व त्यांच्या शिक्षणाचा फायदा आपल्या देशाला जास्त होईल अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरीखंदारे या गावातील एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याने केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. (Demand for increasing the number of students pursuing higher studies abroad to ramdas athawale)

हे देखील पहा -

राजू केंद्रे असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्यांना नुकतीच ब्रिटिश सरकारने शिष्यवृत्ती जाहीर करुन मंजूर केली आहे. त्यामुळे आता त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचण भासणार नाही. मात्र 135 कोटी लोकसंख्येच्या देशात बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो, त्यांसाठी खुप संघर्ष करावा लागला असल्याचे राजू केंद्रे सांगतो. भारत सरकारने किमान 2 हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात शिष्यवृत्ती देऊन पाठविले पाहिजे तर, राज्य सरकारने किमान 500 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन परदेशात उच्च शिक्षण देण्यासाठी पाठवावे अशी मागणी रामदास आठवले यांना पाठविलेल्या पत्रातुन राजू केंद्रे यांनी केली आहे.

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी लाखो रुपये खर्च होतो. एवढा खर्च झेपावणे शक्य होत नसल्याने विद्यार्थी खुप हुशार असून सुद्धा फायदा होत नाही. म्हणुन केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या लक्षात आणून देण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT