नवी मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबईतील वाशी येथे पहिल्यांदाच ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांच जनसंपर्क कार्यालय
शेकडो शिवसैनिक उद्घाटन प्रसंगी उपस्थित
मंत्री गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज काय संबोधित करणार याकडे सर्वाच लक्ष
दिल्लीत भाजपने निर्विवाद यश मिळवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बदलापुराही आ. किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे भरवत विजयाचा जल्लोष साजरा केला. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा सुपडा साफ झालाय. या निकालाने दिल्लीतील 12 वर्षांची 'आप'ची भ्रष्टाचारी सत्ता संपुष्टात आली अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार किसन कथोरे यांनी दिली.
तुळजापुर येथील घाटशिळ पार्किंगमध्ये उभी असलेली एका कारने अचानक पेट घेतला. आगीत कार जळून खाक झालीय. कारने कशामुळे पेट घेतला याचे कारण अजून कळू शकले नाहीये.
अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची शिर्डीत मोठी कारवाई केलीय. आरोपीचा गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघाआरोपींना ठोकल्या बेड्या तर दोन आरोपी फरार झालेत. 3 गावठी कट्टे, 3 जिवंत काडतुसांसह 2 लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी गणेश शेजवळ, अजय शेजवळ, रोशन कोते यांनी पोलिसांनी अटक केलीय.
परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि सुरेश धस यांची मध्यस्थी यशस्वी ठरलीय. सोमनाथ सुर्यवंशी हत्याप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी परभणी ते मुंबई दरम्यान काढण्यात आलेला लाँग मार्च स्थगित करण्यात आलाय. २३ व्या दिवशी आंदोलकांचा लाँग मार्च स्थगित झालाय. आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर लाँग मार्च स्थगित झालाय.
मध्यप्रदेशमध्ये निर्मित मद्याची महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती नाशिक राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. या पथकाने नाशिकच्या येवला-कोपरगाव राज्य मार्गावरील टोल नाक्याजवळ आयशर गाडीवर छापा टाकला. दारुचा साठा पकडला असून गाडीतून तब्बल लाखो रुपये किमतीचे दारुचे ११४१ विदेशी मद्याचे बॉक्स हस्तगत केले असून या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
आश्रम शाळेतील 59 विद्यार्थ्यांना विषबाधा
विद्यार्थ्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
वीस विद्यार्थी अत्यावश्य मात्र प्रकृती धोक्याबाहेर
गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात
भरधाव वेगात असलेल्या दुचाकी चालकाने दिली बेस्ट बसला धडक
दुचाकी चालकाने बेस्ट बसला समोरून दिली जोरदार धडक, दुचाकीस्वराचा जागेवरच मृत्यू
आरे पोलीस ठाणे परिसरात मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी
- चतुश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुतण्याकडुन चुलत्याचा खुन
- महेश तुपे वय ५८ असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव
- संपत्तीच्या वादातुन करण्यात आला आहे खुन
- चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात पुतण्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल
- बॅंकेतील संयुक्त खात्यातील एफडीतील पैसे काढुन देण्याची पुतण्याची होती मागणी
ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे येथे मसूर डाळची वाहतूक करणारा ट्रक उलटला.
ट्रक मसूरच्या डाळीने भरलेला असल्याने रस्त्यावरून बाजूला करण्यात अडचणी येत आहेत.
क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला काढण्याचे काम सूरू.
तुर्भे वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.
बेलापूरला जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.
जेवण सांडल्यावरून मजुरांमध्ये वाद, एका मजुराने केली दुसऱ्या मजुराची हत्या
डोंबिवलीतील दीनदयाल रोड परिसरात एका बांधकाम साईटवर घडला प्रकार
या वादानंतर सर्व मजूर झोपले असताना संतापलेल्या मजुराने बांबूने मारून सहकारी मजुराची हत्या केली.
विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा फोटो असलेला बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकाला तातडीने अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिलाय.. राज्यात ज्यावेळी भाजपचे सरकार येते त्यावेळी अशा घटना घडतात असा आरोप देखील खरात यांनी केलाय..
नागपुरात टिकळ पुतळा महाल परिसरात भाजपच्या दिल्ली विजयाचा जल्लोष....
महिला आणि भाजपचे पदाधिकारी करत आहे जल्लोष,
ढोल तशा वाजवत करत आहे जल्लोष..
- शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- पठारे पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार
- पाणी प्रश्नासंदर्भात फडण फडणवीस यांची भेट घेतल्याचा पठारे यांचं म्हणणं
- हयात हॉटेलमधील एका कार्यक्रमादरम्यान पठारे यांनी घेतली फडणवीस यांची भेट
शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला पिकअप जीपने धडक दिली.नांदेड च्या अर्धापूर ते तामसा रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात 12 विध्यार्थी जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या भव्य विजयाचा आनंद धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे, ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतेषबाजीत आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे, यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पहावयास मिळाला आहे,
एक्झिट पोल सांगत होता की भाजपला दिल्लीत बहुमत मिळणार आहे म्हणून त्यांनी काल ती प्रेस घेतली. कुणावर तरी खापर फोडलं पाहिजे म्हणून राहुल गांधींनी ती प्रेस घेतली. राहुल गांधी यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करारवींद्र चव्हाण
- दिल्लीत भाजपला यश मिळाल्याने जल्लोष
- नाशिकच्या भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत आनंदोत्सव
- महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत व्यक्त केला आनंद
- फटाक्यांची आतषबाजी आणि एकमेकांना पेढे भरवत भाजप कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव
दिल्लीचा विजय हा नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर दिल्लीकरानी ठेवलेला विश्वासाचा विजय आहे. काल दिल्लीत तीन माकडं बसून ईव्हीएम वर बोलत होती ही माकड आज आहेत कुठे असा सवाल करताना कालच्या संजय राऊत राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेवर नितेश राणे यांनी टीका केली. 27 वर्षानंतर दिल्लीच्या जनतेने जो विश्वास दाखवला आहे तो नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर दाखवलेला विश्वास आहे. या निकालावरून राहूल गांधीची लायकी समजली अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिल्लीच्या निकालावर दिली आहे.
मनिष सिसोदिया यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय.
काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट झाले आहे. सत्तर पैकी एक सुद्धा जागा काँग्रेसला मिळालेली नाही..मंत्री गिरीश महाजन
राजधानी दिल्लीमध्ये कमळ फुललल्याचे दिसत आहे. ७० जागांपैकी ४५ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. आप पक्ष फक्त २५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसच्या जागांची पाटी मात्र कोरीच राहिल्याचे दिसत आहे.
पुण्यातल्या श्रमिक पत्रकार संघाच्या घेण्यात आला कार्यक्रम
विधानपरिषदचे सभापती पदी निवड झाल्या बाबत राम शिंदे यांचा तर कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल दत्ता भरणे यांचा सत्कार होणार
सरकार जाणून बुजून फसवणूक करायला लागलंमनोज जरांगे पाटील
दिल्लीतील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलानुसार, भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. भाजप आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.
अकोल्यात तिहेरी वाहनांचा भीषण अपघात झालाय.. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाये.. तर सहा जण जखमी झाले.. अकोल्यातल्या अकोला दर्यापूर रस्त्यावरील आपातापा गावाजवळ ही अपघाताची घटना घडली आहे.. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.. स्थानिक नागरिकांनी मदत करत जखमींना रुग्णालयात हलविले.
- नंदुरबार बाजार समितीत सीसीआय कडून खरेदी केलेल्या कापसाची 110 कोटीची उलाढाल झाली....
- शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी केली असून, आतापर्यंत 110 कोटीची उलाढाल ....
- दीडशे क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून यावर्षी 200 क्विंटल कापसाची खरेदी होणार्या अंदाज व्यक्त केला गेला काय आहे.....
- यावर्षी शेतकऱ्यांना परवडणार नाही असा भाव असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्री केलेला नाही आहे.....
- त्यामुळे उलाढालीच्या आकडा दीडशे कोटीपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली आहे.....
- नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक कापसाची लागवड करण्यात येत असते.....
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापनेकडे आगेकूच केली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपला आघाडी मिळाली आहे. भाजपचे ४० उमदेवार आघाीवर आहेत,तर आपला २९ जागांवर आघाडी मिळाली आहे.
दोन तास पिछाडीवर राहिल्यानंतर अखेर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आघाडीवर आले आहेत.
सुनील अशोकराव कांगणे वय 39 वर्ष असं पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. सुनील कांगणे यांने 2009 मध्ये सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत सुभाष सोपान धाकतोडे या 55 वर्षाच्या व्यक्तीचा खून केला होता. सेक्युरिटी ड्युटी चा पॉईंट बदलल्याने चिडून जाऊन सुनील कांगणे याने सुभाष धाकतोडे यांचा 2009 मध्ये खून केला होता. मूळचा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेला सुनील कांगणे हा खून केल्यानंतर पसार झाला होता. पोलिसाच्या हातावर तुरा देण्यासाठी तो सतत आपली कामाची ठिकाण आणि स्थळ बदलत होता. मात्र अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक एक पोलीस पथकाने त्याचा शोध घेऊ त्याला गोवा राज्यात जाऊन त्याला खूना सारख्या गंभीर गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत.
२७ वर्षानंतर दिल्लीची सत्ता भाजपच्या हातत येणार आहे. ७० जागांवर भाजपचे ४९ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.
दिल्लीमध्ये सत्तांतर होत असल्याचे सुरूवातीच्या कलांमध्ये दिसत आहे. ७० जागांवर भाजपचे उमेदवार ४९ जागांवर आघाडीवर आहेत. आपला फक्त २१ जागांवरच आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.
- नाशिकमधील ८ बांगलादेशी घुसखोरांचं अटक प्रकरण
- नाशिक शहरासह अन्य भागातही बांगलादेशी घुसखोर मजुरांचं वास्तव्य
- अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर
- बांगलादेशी घुसखोरांना राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आणण्यासाठी एजंट्सचा वापर
- मोठे एजंट्स मुंबई, पुण्यात सक्रिय असल्याचीही माहिती समोर
- नाशिकमध्ये मुंबई, पुण्यापेक्षा जास्त मजुरी रक्कम मिळत असल्यानं नाशिकमध्ये घुसखोरी केल्याची कबुली
- दरम्यान आठही बांगलादेशी घुसखोरांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
धाराशिव च्या कळंब नगर परिषदेकडून दिवसेंदिवस वाढत असलेली थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.नगर पालिकेला मालमत्ता कर,पाणीपट्टी, शिक्षण कर,इमारत भड्यातून चार कोटी 7 लाख येणे अपेक्षित आहे.त्यापैकी केवळ 1 कोटी 45 लाखांची वसुली झाली आहे.उर्वरीत 2 कोटी 61 लाख रुपयांच्या वसुलीसाठी नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून यासाठी पाच विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आलीय.
अमरावती शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरता यावा म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या पाचही झोनमध्ये शनिवार रविवार दोन दिवस सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार आहे.यासोबतच मालमत्ता कर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केले आहे
मेहेकर तालुक्यातील पेन टाकली या गावाचे रखडलेले स्थलांतर अद्याप पर्यंत झालेले नसल्याने ग्रामस्थांना जुन्या गावात धरणाचे पाणी शर्ट असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा कुठलीही उपाय योजना केल्या गेली नसल्याने पेन टाकली ग्रामस्थगणी पेन टाकली धरणात गेल्या तीन दिवसापासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे... याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे..
जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील दैठना बुद्रुक गावात वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांकडून दगडफेक आणि मारण्याची घटना समोर आली आहे . या घटनेनंतर गौण खनिज पथकात काम करणाऱ्या महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे महसूल पथकातील कर्मचाऱ्यांच्या संरक्षणसाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्या अन्यथा गौण खनिज पथकात एकही कर्मचारी काम करणार नाही असा इशारा ग्राम महसूल संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी दिलाय. महसूल पथकात काम करताना शासकीय वाहन आणि पथकातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी कर्मचारी द्यावा. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.दरम्यान याआधी देखील यासंदर्भात जालना जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिल असून सोमवारी भेटून देखील सविस्तर निवेदन देणार असल्याच जिल्हाध्यक्षांनी म्हटलं आ
वाशिम जिल्ह्यात नाफेडच्या शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन मोजणी थांबताच शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे धाव घेतली असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या आणि उपबाजारांत तब्बल १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची नोंद झाली आहे..
सुरूवातीच्या कलांनुसार, राजधानी दिल्लीमध्ये सत्तांतर होत असल्याचे दिसत आहे. दिल्लीच्या सुरूवातीच्या ७० जागांवर कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप ४१ जागांवर आघाडीवर आहे, तर आपला फक्त २८ जागांवर आघाडी मिळाली आहे.
सुरूवातीच्या कलामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप २८, आप २७ जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. दिल्ली विधानसभेच्या ५५ जागांचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजप आणि आपमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.
सुरूवातीच्या कलामध्ये आप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया पिछाडीवर आहेत. भाजप १४ तर आप १३ जागांवर आघाडीवर आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 10 वाजता अंतरवाली सराटीत जरांगे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सातवं आमरण उपोषण स्थगित करताना जरांगे यांनी आता पुन्हा उपोषण नाही हे स्पष्ट केलं होतं. त्यावेळी त्यांनी मुंबई जाण्याचा विचार देखील बोलून दाखवला होता. मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही मुंबई येणार असं जरांगेंनी सांगितलं होतं. मात्र, या संपूर्ण घडामोडी नंतर जरांगे आज अंतरवाली सराटीत महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असून आजच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकी अगोदर पासून 9000 अर्ज होते प्रलंबित, योजनेच्या अटीत न बसणारे मंजुरी न मिळालेले अर्ज फेटाळले
इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची तपासणी मोहीम सुरू
चार चाकी वाहन असलेल्या, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे वगळली
जिल्ह्यात चार लाखाहून अधिक अर्ज मंजूर, मंजुरी मिळालेल्या अर्जांची राज्यस्तरावरून तपासणी होणार
तर दहा महिलांचा अनुदान बंद करण्यासाठी अर्ज, दोन बहिणींनी अनुदान केले जमा
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची मुंबई लेन वाहतुकीसाठी खुली झाली असली तरी कोकणात जाणाऱ्या लेनची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या लेनचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. 2 किलोमिटर लांबीचा हा बोगदा सुरू करण्याच्या तारखा वारंवार देण्यात आल्या परंतु बोगद्यातील सुविधांची कामे सुरू आहेत. आता पुढील दोन महिन्यात बोगदा वाहतुकीसाठी सुरू होईल, असं सांगितलं जातंय.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने साताऱ्यातील शाहू कला मंदिरात येथे तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ११ फेब्रुवारी असा हा महोत्सव रंगणार असून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सकल्पनेतून हा महोत्सव घेण्यात आला आहे.खा.उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी, या उद्देशाने डोलकी फड तमाशा महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच ढोलकी फड तमाशा महोत्सवाच्या आयोजन करण्यात आल्याने शाहू कला मंदिर मध्ये मोठ्या प्रमाणात तमाशा रसिक जणांनी गर्दी केली होती.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून देखील ग्रामपंचायतीला विकास निधी मिळत नसल्याचा तक्रार सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वडडी ग्रामपंचायतीने केला आहे,वडडी ग्रामपंचायत मध्ये भाजपाची एक हाती सत्ता आहे,मात्र भाजपाची सत्ता असून देखील भाजपची ग्रामपंचायत म्हणून गावच्या विकासासाठी निधी कमी देण्यात येत आहे,त्यामुळे विकास कामं करण्यात अडचणी येत,असल्याचे मत वड्डी ग्रामपंचायतीचे नेते महेंद्रसिंह शिंदे यांनी व्यक्त करत पक्षांतर करण्याचा इशारा देखील शिंदे यांनी वड्डी ग्रामपंचायतीच्यावतीने भाजपाला दिला आहे.
धाराशिव च्या परंडा तालुक्यातील सिना कोळेगाव प्रकल्पातुन बेकायदेशीर सोडलेले पाणी तात्काळ बंद करावे अन्यथा जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दिलाय.या बाबात शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देखील दिले असुन सिना कोळगाव प्रकल्पातील कालव्याद्वारे लाभ क्षेत्राबाहेर बेकायदेशीर पाणी सोडण्यात आले असुन पाणी सोडण्यापुर्वी पाणी परवाना घेण्यात आलेला नाही,व कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केली नाही तसेच पाणी सोडताना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुर्व कल्पना देण्यात आलेली नाही त्यामुळे सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दिल्लीमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप १४ जागांवर आघाडीवर आहे, तर आप पक्षाला १३ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
दिल्लीच्या निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अरविंद केजरीवाल सध्या पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीअगोदर पासून 9000 अर्ज होते प्रलंबित, योजनेच्या अटीत न बसणारे मंजुरी न मिळालेले अर्ज फेटाळले
इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची तपासणी मोहीम सुरू
चार चाकी वाहन असलेल्या, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला, तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांची नावे वगळली
जिल्ह्यात चार लाखाहून अधिक अर्ज मंजूर, मंजुरी मिळालेल्या अर्जांची राज्यस्तरावरून तपासणी होणार
तर दहा महिलांचा अनुदान बंद करण्यासाठी अर्ज, दोन बहिणींनी अनुदान केले जमा
दिल्लीत भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे. पहिल्या कलानुसार, भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करून सामाजिक अशांतता पासरविणार्या अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिवसेना उबाठा गटाची मागणी
उबाठा शिवसेनेने राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर गेल्या होत्या तीव्र आंदोलन
राहुल सोलापूरकर याने एका पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी अनेकांना लाच दिली होती. असे वक्तव्य केले असून ह्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी जनतेमधील प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
राहुल सोलापूरकर याच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणे, महापुरुषांचा अपमान करणे, सामाजिक सलोखा बिघडविणे, ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा.अशी मागणी केली आहे.
तसेच सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी अशी व्यवस्था आपल्या मार्फत व्हावी.अन्यथा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या सन्मानार्थ सोलापूरकरला अटक होउन गुन्हे दाखल करेपर्यंत सातत्याने आंदोलनं करावे लागेल असा इशारा देण्यात आलाय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दिल्लीचा गड कोण राखणार? केजरीवाल यांच्याकडेच सत्ता राहणार की भाजप विजय मिळवणार, थोड्याच वेळात उत्तर मिळणार
धाराशिव च्या परंडा शहरातील परंडा बार्शी रोडवरील भारत ठाकुर यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून घरातील रोख 75 हजार रुपयांच्या रक्कमेसह सोन्याचे मंगळसूत्र,कानातील फुले असा एकुन 1 लाख 16 हजार रुपये किंमतीचे साहीत्य अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घराफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तसेच ठसे तज्ज्ञ पथकाने देखील पाहणी केली असुन पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू केला आहे.
प्रवासी सुविधांमुळे निर्देशांकात ७४ स्थानांवरुन ६७ व्या स्थानी नोंद.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू झाले आणि प्रवासी सेवा-सुविधांमध्ये सुधारणा आणि गती मिळाली.त्यामुळे गुणवत्ता निर्देशांकात ७४ स्थानावर असलेले पुणे विमानतळ आता ६७ व्या स्थानवर आले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तीन महिन्यांतील विमानतळावरील सुविधेबाबत विमानतळ प्राधिकरण व 'एसीआय-एएसक्यू' (एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिस कालिटी) यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
सराफ बाजारातील कारागिराकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी त्याच्याकडील २० लाखांचे दागिने असलेली पिशवी हिसकावून नेली. रविवार पेठेतील मोती चौक परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी चिरंजीत अंबिका बाग यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चिरंजीत हा एका दागिने घडविणाऱ्या कारागिराकडे कामाला आहे. गुरुवारी सायंकाळी तो रविवार पेठेतून निघाला होता. त्याच्या पिशवीत १९ लाख ९४ हजारांचे सोन्याचे दागिने होते. मोती चौकात पुष्पम ज्वेलर्ससमोर दोघांनी त्याला पत्ता विचारण्याचा बहाण्याने दागिन्यांची पिशवी हिसकावून पळ काढला..
रेल्वे प्रशासनाकडून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्यानुसार पुणे विभागाकडून गेल्या दहा महिन्यांत राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत २ लाख ९३ हजार ८०६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
त्यातून १५ कोटी ८६ लाख ६९ हजार ४५० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि गाडीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांना तिकीट तपासणी दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
आरक्षित स्लीपर बोगीतून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या तब्बल ५४ हजार प्रवाशांकडून कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर प्रवासादरम्यान क्षमतेहून अधिक साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून २ लाख ४९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
या प्रकारच्या प्रवाशांवर बडगा
विनातिकीट – २,३४,८०६
बेकायदेशीर – ५४,०८९
सामान बुक न करता जाणारे – ४४१२
एकूण कारवाई – २,९३,३०७
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात
दुपारी 12 ते 4 या वेळेत तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांना राहणार उपस्थितीत
शरद पवार ही आज पुण्यात सायंकाळी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला राहणार उपस्थितीत
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये कार्यक्रमांना राहणारे उपस्थितीत
तर दुपारी दीड वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पुण्यात पत्रकार परिषद
'वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात अवजड वाहनांना २४ तास बंदी घालण्यात आली आहे.मात्र, याचा परिणाम घरांच्या किमतींवर होणार आहे. बांधकामाच्या मालाची वाहतूक करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने आपसूकच इतर किमतींमध्ये वाढ होणार असल्याने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.अन्यथा सोमवारपासून कच्च्या मालाची वाहतूक बंद करण्याचा निर्णय संघटनांकडून घेण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय.
तर बांधकाम व्यावसायिकांकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाचा फटका अंतिमत: सामान्य नागरिकांनाच बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे. शहर आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. वाहतूक पोलीस, महानगरपालिका, परिवहन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लासुर शिवारातील नागपूर-मुंबई महामार्गावर एका भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरातील लासुर शिवारात असलेल्या नागपूर-मुंबई महामार्गावर दुजाकीवर जाणाऱ्या रमेश तुकाराम माळी हे जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रमेश माळी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. रमेश माळी यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
नागपूर
- वाडी पोलिसात कार्यरत हवालदाराची आर्थिक तणावातून राहत्या घरी केली आत्महत्त्या
- हेमराज ज्ञानेश्वर जीचकर असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव..
- प्लॉट खरेदी केला असतांना रजिस्ट्री जवळ येऊन पैश्याची जुळवा जुळव होत नसल्याने होता आर्थिक तणावात
- शुक्रवारी साप्ताहिक रजा असताना घरात पत्नी मुलगा, मुलगी, बाहेर गेले असतांना घरात गळफास घेऊन आत्महत्या.
- वाडी पोलिसात कार्यरत असून घर गिट्टीखदान पोलिसात घर असल्यानं घटनेची नोंद करण्यात आली..
Maharashtra Live Update : उद्धव ठाकरे संपले असे समजू नका, खासदार संजय जाधवांनी कुणीही उबाठा सोडून जाणार नसल्याचे केले स्पष्ट
आम्ही त्यांच्याकडे जाणार असल्याचा संभ्रम निर्माण केला जातोय मात्र असा कुठलाही संभ्रम नाही आम्ही नऊ जण कुठेही जाणार नाहीत आणि यांनी उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत याचा अर्थ ते संपले असं नाही होत बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे जनाधार आहे लक्षात ठेवा विनाकारण संभ्रम निर्माण करून गढूळ राजकारण करू नका आम्ही कुणीही कुठे जाणार नाहीत असे परभणीतील शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी स्पष्ट केले आहे. खासदार फुटी बाबत त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी याबाबत हे विधान केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.