Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: विकास निधी येण्यास विलंब..., शिंदेंच्या नेत्यानंतर दादांच्या शिलेदाराचाही लाडकीवर सवाल

Minister Dattatray Bharane: राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भारणे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केले आहे. विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचे खापर त्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींवर फोडले.

Priya More

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठं विधान केले आहे. लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचे विधान त्यांनी केले आहे. इंदापूरमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. लाडकी बहीण सत्ताधाऱ्यांना नकोशी झाली काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये लाडकी बहिणी योजनेबाबत बोलताना मोठं वक्तव्य केले. लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत आहे. इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटप कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. या अगोदर देखील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याचे विधान केले होते.

त्यांच्या या विधानानंतर दत्तात्रय भरणे यांना लाडक्या बहिणी नकोशी झाल्यात काय? असाच प्रश्न उपस्थित केले जाता आहे. सत्तेमधीलच मंत्री जर लाडक्या बहिणीबद्दल असे विधान करत असतील तर लाडकी बहीण ही योजना लवकरच गुंडाळतील की काय? असाच प्रश्न आता महाराष्ट्रातील महिलांना पडला आहे. दत्तात्रय भरणे यांच्या अशा विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना समज देतील काय? हे पाहणं महत्वाचे ठरेल.

याआधी लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी वळवला जात असल्याची माहिती समोर आली होती. लाडक्या बहिणींसाठी सरकारची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला असल्याचे सांगण्यात आले होते.

सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठी ४१०.३० कोटींचा निधी वळवण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. याआधी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला असल्याचे देखील बोलले जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E-Scooter: ई-स्कूटर खरेदी करताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, निवडताना काय तपासावे?

Monsoon Update : सप्टेंबर २०२५मध्ये मुसळधार पाऊस; तब्बल १०९% पावसाचा अंदाज

Nanded : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महालक्ष्मी सणावर विरजण; मराठा महिलांनी घेतला निर्णय

Priya Marathe Death: 'तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं...'; जिव्हाळ्याची मैत्रीण गेल्यानं प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर

Manoj jarange patil protest live updates: सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी

SCROLL FOR NEXT