Dehu Sansthan saam tv
महाराष्ट्र

Tukaram Maharaj Palakhi: देहू संस्थेने घेतला मोठा निर्णय; जगद्गुरु तुकारामांच्या पालखीची प्रथा बदलणार

Dehu Sansthan Breaks Tradition: जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यात यंदा ऐतिहासिक बदल घडणार असून, रथाला बैलजोडी जुंपण्याची परंपरागत पद्धत प्रथमच मोडली जाणार आहे

Omkar Sonawane

जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी सोहळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी देहू संस्थांची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर यावर संस्थेने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीला ओढण्यासाठी संस्थांची स्वतःची मालकीची बैलजोडी खरेदी करणार आहे.

दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होत असतात, आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध जोड्यांना हा मान दिला जायचा. मात्र यंदाच्या वर्षी बैल जोडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे महाराजांच्या पालखी रथाला संस्थाने स्वतः खरेदी केलेली बैलजोडी असणार आहे.

जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला व चौघडा गाडीसाठी जुंपण्यासाठी प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने स्वतः बैलजोडीची खरेदी करणार असल्याचे प्रसिद्धीद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया व रथाला बैलजोडी जुंपण्याचा मिळणारा मान ही प्रचलित प्रथा यंदा प्रथमच बदलली जाणार आहे.

यंदा संस्थानच्या नवनिर्वाचित पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त मंडळाने प्रथमच संस्थानच्या वतीने बैलजोडी खरेदी करून त्यांनाच रथाला जुंपण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. हा आश्चर्यकारक व ऐतिहासिक बदल असणार आहे.

यामुळे जिल्ह्यातील परिसरातील श्री संत तुकाराम महाराजांवर श्रद्धा ठेवणारे शेतकरी व भाविक नाराज होण्याची शक्यता आहे . पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान मिळणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने भाग्याचे होते. श्री संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा 18 जूनपासून पंढरपूरकडे श्री क्षेत्र देहूगाव येथून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT