Devendra Shinde injured after alleged sickle attack by defeated political candidate Mangesh More in Nashik. Saam Tv
महाराष्ट्र

निवडणूक हरल्याचा राग, ठाकरेंच्या नेत्याचा देवेंद्र शिंदेंवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik Political Attack Case Devendra Shinde Injured: नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून ठाकरे गटाचा पराभूत उमेदवार मंगेश मोरे याने देवेंद्र शिंदे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Saam Tv

महापालिकेच्या निवडणुकीत तुझ्यामुळे माझा पराभव झाला असे सांगून कुरापत काढत ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झालेला उमेदवार आणि कुख्यात गुंड मंगेश मोरे आणि त्याच्या टोळीने एका व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

नाशिकच्या जेलरोड येथे राहणारा फिर्यादी युवक देवेंद्र शिंदे हा गेल्या रविवारी रात्री साडे अकरा वाजता घराबाहेर गर्दी दिसल्याने काय झाले म्हणून बघण्यासाठी गेली. यावेळी ठाकरे गटाचा पराभूत उमेदवार कुख्यात गुंड मंगेश मोरे त्याचा भाऊ नीलेश मोरे आणि सुरज खरात हे जोरजोराने आरडाओरड करत होते. मंगेश मोरेने देवेंद्र शिंदे यांना काही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. देवेंद्र यांनी विचारले असता तुझ्यामुळे मी निवडणूक हारलो...' असे म्हणत मंगेश याने देवेंद्र यांना हाताच्या चापटीने मारहाण करत डोक्यात कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हणे कायद्याचा बालेकिल्ला...;

निवडणुकीआधी नाशिक शहरात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमेमध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांना पोलिसांनी खाक्या दाखवल्या होत्या. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना पोलिसांनी चांगलाचा प्रसाद देऊन नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित केली होती. तसेच काही नेते अजूनही जेलची हवा खात आहे. मात्र निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय गुंडांनी हैदोस घालायला सुरुवात केली असून नागरिकांमध्ये आता पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कुख्यात गुंड मंगेश मोरेची पार्श्वभूमी

मंगेश मोरे हा जेलरोड येथील कॅनल रोड झोपडपट्टीमध्ये राहतो. त्या ठिकाणी त्याने दहशत माजवत अनेक गैरधंदे सुरू केले आहे. सुरुवातील तो भाजपमध्ये होता, स्थानिक भाजप आमदार यांचा तो निकटवर्तिय मानला जात. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद देखील आहे. ऐन निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळाले नसल्याने त्याने ठाकरे गटात प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र प्रभागातील सुज्ञ जनतेने त्याचा पराभव करत तोंडावर आपटवले. याचाच राग तो काढत असून दहशत पसरवत आहे. आता नाशिक पोलिस या गुंडावर काय कारवाई करता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

अशोक खरातचे डर्टी चॅट्स अन् नको ते व्हिडिओ आले समोर; पोलिसांनी रिकव्हर केला मोबाईल डेटा, मोठा भांडाफोड होणार

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

SCROLL FOR NEXT