Sharad pawar
Sharad pawar  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: 'शरद पवार कुठली खेळी खेळतील याचा अंदाज कुणालाच येऊ शकत नाही'

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

Deepak kesarkar On Sharad Pawar: शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांच्या निवृत्तीवर अनेक राजकीय पडसाद उमटत आहे. तसेच शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

दिपक केसरकर सध्या अहमदनगर दौऱ्यावर आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे केसरकर यांनी शरद पवारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले, 'शरद पवार उत्कृष्ट राजकारणी आहेत. ते कुठली खेळी खेळतील याचा अंदाज कुणालाही येवू शकत नाही. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे त्यांचे स्थान बळकट झाले आहे. परंतु आत्मचरित्राकडे लोकांचे दुर्लक्ष झाले'.

'आम्ही मांडलेली भुमिका खरी होती यावर पवारांनी शिक्कामोर्तब केलं. उद्धव ठाकरे लोकांना वेळ देत नव्हते, त्यामुळे शिवसेना फुटली. शिवसेना खोक्यांमुळे फुटली नाही. आदित्य ठाकरेंना हे पटवून देण्याचं काम पवारांनी केलं, असेही केसरकर पुढे म्हणाले .

'जेष्ठ व्यक्ती जेव्हा आत्मचरित्र लिहते, तेव्हा ते सत्य मांडत असतात. उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, मुख्यमंत्री असताना जे घडलं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं', अशा शब्दात दिपक केसरकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

'शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की, ज्या शिवसैनिकांना वाटतंय आपल्यावर अन्याय झाला त्यांना उत्तर देण्याचं काम पवारांनी केलं. आत्मचरित्रातील हा भाग लोकांनी अवश्य वाचायला हवा. पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. आत्मचरित्रातून वस्तुस्थिती जनतेसमोर आणली त्याबद्दल आभार, असेही केसरकर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

SCROLL FOR NEXT