Smriti Irani on Priyanka Gandhi : 'प्रियांका गांधींना मी रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिलं', असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच काँग्रेस आणि भाजप आपली संपूर्ण ताकद लावून प्रचार करत आहेत. यातच राज्यात उत्तर भारतीयांचे मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही पक्षातील उत्तर भारतात आपली पकड असलेले नेते प्रचारासाठी उतरले आहेत. याच दरम्यान 'एएनआय' या वृत्त संस्थेशी बोलताना स्मृती इराणी असं म्हणाल्या आहेत.
स्मृती इराणी म्हणाल्या की, मला शिवकुमारजींना सांगायचे आहे की ते मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यामुळे त्यांनी मंदिराचे वचन न दिलेलेच बरे. (Latest Marathi News)
इराणी म्हणाल्या की, माझा त्यांना प्रश्न आहे की, असे वाक्य बोलण्यापूर्वी त्यांनी श्रीमती वड्रा यांचा विचारणा केली का? मी हे म्हणत आहे, कारण २०१९ मध्ये मी श्रीमती वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांना रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिले होते. इस्लाम धर्म मानणारे मूर्तीचे पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.
कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे इराणी म्हणाल्या आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता टाकून प्रत्येक धर्माच्या आणि प्रत्येक वर्गातील महिलांना सक्षम बनवण्याची आपली वचनबद्धता बळकट केली आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.