- विनायक वंजारे
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (deepak kesarkar) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) या दाेन्ही काेकणातील नेत्यांची आज (साेमवार) कणकवली येथे झालेली भेट सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली. काेकणात राजकीय शत्रू म्हणून ओळखले जाणारे दाेन्ही नेते तब्बल 12 वर्षानंतर भेटले. केसरकर यांची राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतल्याने परिसरात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. (Maharashtra News)
सन 2014 च्या निवडणुकीपूर्वी दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात प्रचंड वादंग निर्माण झाला होता. नारायण राणे यांचा उल्लेख दीपक केसरकर यांनी नरकासुर असा देखील केला होता. दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांच्या पराभवासाठी विशेष प्रयत्न केले होते.
आज खऱ्या अर्थानं हा वाट मिटण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा कणकवली येथील राजकीय वर्तुळात सुरु आहे. नौसेना दिनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या नियोजन बैठकी संदर्भात दीपक केसरकर हे नारायण राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर आलेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
नारायण राणे यांनी केसरकर यांचे स्वागत केले. केसरकर यांनी राणेंना पुष्पगुच्छ दिल्यानंतर दाेघांत बैठकीस प्रारंभ झाला. दरम्यान दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर आणि नारायण राणे यांची आजची भेट (मनोमिलन) महत्त्वाची मानली जात आहे.
डीएड पदवीधर बेरोजगार नेत्यांच्या भेटीला
दरम्यान डीएड पदवीधर बेरोजगार आज नारायण राणे यांच्या भेटीसाठी ओम गणेश बंगल्यावर पोचले आहेत. या ठिकाणी नारायण राणे आणि केसरकर यांची बैठक सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने बेरोजगार जमलेले आहेत. डीएड बेरोजगारांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे यासाठी हे बेरोजगार पदवीधर तरुण जमलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांची नारायण राणे यांच्या उपस्थितीत दीपक केसरकर यांची भेट होणार आहे असे सांगितले जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.