Deepak Kesarkar  Saam Digital
महाराष्ट्र

Deepak Kesarkar : दीपक केसरकरांनी 'दिवे लावले', दुर्घटनेत संधी शोधतायत शिक्षणमंत्री ? नेव्हीवर खापर फोडल्यानं विरोधकांचाही निशाणा

Girish Nikam

गिरीश निकम, साम टीव्ही प्रतिनिधी

शिवरायांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून ही आणखी उंच पुतळा बांधण्यासाठी संधी आहे असं अजब विधान केल्यामुळे शिक्षणमंत्री दीपक केसरकर वादात सापडले आहेत. एवढंच नव्हे तर पुतळा उभारण्याची घाई नौदलनानं केल्याचाही दावा त्यांनी केलाय. त्यामुळे आधीच पेटलेल्या वादात आणखीनच तेल ओतलं गेलंय. केसरकर नेमकं काय म्हटले आणि विरोधकांनी त्यांना कसं घरले यावरचा हा विशेष रिपोर्ट...

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होतोय. ठिकठिकाणी निषेध, आंदोलनं होतायेत. विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. हे कमी होतं की काय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नको ते दिवे लावून वादग्रस्त विधान केल्यानं वाद आणखीनच भडकण्याची चिन्ह आहेत. महाराजांच्या पुतळा कुणाच्या चुकीमुळे कोसळलेला नाही तर हा केवळ अपघात असल्याचा दावा केला. एवढंच नव्हे तर वाईटातून चांगलं करण्याची संधी मिळाल्याचं अजब विधान केसरकरांनी केलंय. तर हा अपघात नव्हे तर भ्रष्टाचार असल्याचा निशाणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी साधलाय.

शिक्षणमंत्री केसरकर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पुतळा घाई-घाईत उभारल्याची कबुलीच दिली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यासाठी नोदलांनं घाई-घाईत पुतळा उभारल्याचा दावा केला. त्यामुळे विरोधकांना आणखी एक आयता मुद्दा मिळाला. नौदलावर खापर फोडणं हा नौदलाचा अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतेज पाटलांनी व्यक्त केलीय.

पुतळ्याचे 5 टन वजन पेलण्यासाठी आवश्यक धातूचा वापर केला होता का?

धातुची जाडी, मटेरीअल याचं स्ट्रक्चरल ऑडीट झालं होतं का ?

केवळ 15 दिवसांत पुतळ्याचे धातूकाम पूर्ण करणं गुणवत्तेशी तडजोड नाही का?

वाऱ्याची दिशा आणि वेगाबाबत तांत्रिक अभ्यास का केला नाही?

संपूर्ण कामाच्या गुणवत्तेची तपासणी का केली नाही?

पुतळा उभारणीनंतर आठ महिन्यांत किती वेळा तपासणी झाली ?

एव्हढी धक्कादायक घटना घडल्यानंतर त्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचं सोडून शिक्षणमंत्री महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेत संधी शोधण्याचं विधान करत अकलेचे तारे तोडतायत. त्यामुळेच महाराज माफ करा म्हणण्याऐवजी....यांना धडा शिकवा अशी म्हणण्याचीच वेळ आता आलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT