अल्पसंख्याक समाजाच्या 100 मुलींसाठीच्या वसतीगृहाचे लातूरमध्ये लोकार्पण SaamTVNews
महाराष्ट्र

अल्पसंख्याक समाजाच्या 100 मुलींसाठीच्या वसतीगृहाचे लातूरमध्ये लोकार्पण

लातूर मोठं शैक्षणिक केंद्र झाले आहे त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या सोयी अपुऱ्या, अधिक सोयी उपलब्ध करून देऊ

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर आता शिक्षणाच्या दृष्टीने मोठे केंद्र झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, वसतीगृह अपुरे आहेत. आज अल्पसंख्याक (Minority) समाजाच्या 100 मुलींसाठीचे हे वसतीगृह (Girls Hostel) उत्तम बांधले आहे. पण इथून पुढे अधिकाधिक मुलांच्या सुविधा असणारे वसतिगृह उभारण्याची गरज आहे, त्यादृष्टीने प्रयत्न करावा अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विभागाला दिल्या. पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनच्या आवारात आज अल्पसंख्याक समाजासाठीच्या 100 मुलींच्या वसतीगृहाचे त्यांच्या हस्ते लोकर्पण झाले त्यावेळी ते बोलत होते.

हे देखील पहा :

यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, राज्याचे गृहनिर्माण तथा अल्पसंख्याक विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड ( दूरदृष्य प्रणाली द्वारे हजर ), माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सहकार, कृषी व अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पाणी पुरवठा व स्वच्छता, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, आ. अमर राजूरकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी आ. हणमंत बेटमुगरेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आयुक्त अमन मित्तल उपस्थित होते.

लातूर (Latur) मध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी आज ज्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले आहे. त्याला जवळपास चार कोटी एवढा खर्च आला असून लातूर शैक्षणिक केंद्र झाल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या दृष्टीने वसतीगृह अपुरे आहेत. त्यासाठी आणखी उत्तम डिझाईन तयार करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था कशी करता येईल असे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जावे अशा सूचना देऊन लातूरच्या विकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. मराठवाड्याची विकासाची भूक मोठी आहे त्यामुळे त्याकडे न्याय दृष्टीने बघण्याची भूमिका सरकारची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बाबतीत सकारात्मक असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखविले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT