मे महिण्यात निधन झालेल्या महिलेला लस घेतल्याचा मेसेज डिसेंबरमध्ये; आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

मे महिण्यात निधन झालेल्या महिलेला लस घेतल्याचा मेसेज डिसेंबरमध्ये; आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : कोरोनाची टेस्ट (Corona Test) आणि लसीकरणाच्या (Vaccination) प्रक्रियेमध्ये आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार सातत्यानं समोर येत आहे. जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचेही समोर आले होते. आता तर 7 महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत पावलेल्या महिलेला 18 डिसेंबर रोजी लस दिल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय.

ज्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट केलीच नाही; त्या व्यक्तीला कोरोना टेस्टिंगचा रिपोर्ट त्याच्या मोबाईलवर पाठवल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आल आहे. आता तर सात महिन्यापूर्वी कोरोनामुळे मृत झालेल्या महिलेला 18 डिसेंबर रोजी कोरोनाची लस दिल्याचं सर्टिफिकेट त्या महिलेच्या कुटुंबियांना आल्यानं कुटुंबीय हैराण झाले आहेत. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील उंडणगाव येथे घडली आहे.

असा झाला आरोग्य विभागाचा कारभार उघड -

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 78 वर्षीय पार्वताबाई अहेलाजी पाटील यांनी 18 डिसेंबर 2021 रोजी 1 वाजून 5 मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे. याबाबत त्यांच्या मुलगा सूर्यभान पाटील यांच्या मोबाइलवर पार्वताबाई यांनी कोविशिल्ड लस (Covishield) घेतल्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांचे लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे. मात्र, पार्वताबाई यांचं 2 मे रोजी निधन झाले होते. 78 वर्षीय पार्वताबाई अहेलाजी पाटील या 21 एप्रिल 2021 ला आजारी पडल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले होते. कोरोना चाचणीत त्या पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर घाटीतच उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचे 2 मे 2021 रोजी निधन झालं होतं. या त्यांच्या मृत्यूची घाटी रुग्णालयासह सिडको पोलीस ठाण्यात नोंद असून, सिडको N-8 भागातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे.

हे देखील पहा -

मात्र, गावातील आरोग्य केंद्रात लस दिल्याचं प्रमाणपत्रावर नोंद आहे, आता आरोग्य अधिकारी सारवासारव करत आहेत की काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळीमध्ये शेख कदीर हे दुसरा डोस घेण्यासाठी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांच्या नावे उत्तरप्रदेशमध्ये लसीकरण (Vaccination) घेतल्याची नोंद होती. त्यामुळे त्यांना अजूनही दुसरा डोस घेता आला नाही. आता तर मृत महिलेला डोस दिल्याची नोंद झाल्यानं लसीकरणातही किती गडबडी आहेत, हे समोर आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: 'डरपोक शिंदे सरकार, निवडणुका घेण्याची हिम्मत नाही', संजय राऊतांनी तोफ डागली; 'वन नेशन, वन इलेक्शन'वरुनही टीका

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

SCROLL FOR NEXT