अकोला : अकोल्यातील (Akola) जुने शहर परिसरात राहणाऱ्या कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराग याच्या विरोधात उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने महात्मा गांधी विरोधात वादग्रस्त विधान केले होते. अकोल्यात काँग्रेसने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजीनगर भागात असलेल्या भावसार पंच बंगल्याजवळ रहिवासी अभिजित धनंजय सराग ऊर्फ कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी 26 डिसेंबर रोजी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्याने काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये (Kotwali Police Station) ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर कालिचरण महाराजाविरुद्ध प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांती कलम 294 व 505 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.