Deadly Attack in Karjat Saam
महाराष्ट्र

पहाटेच्या वेळी शिंदेंच्या घरात घुसले अन् कुटुंबाला मारहाण, चॉपर अन् कोयत्यानं प्राणघातक हल्ला, नेमकं प्रकरण काय?

Deadly Attack in Karjat: पहाटेच्या वेळी घराचा दरवाजा तोडून, घरात घुसून घरातील चार जणांना गंभrर स्वरूपाची मारहाण करण्यात आल्याची घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडली आहे.

Bhagyashree Kamble

  • पहाटेच्यावेळी घराचा दरवाजा तोडला.

  • घरात घुसून घरातील चार जणांवर हल्ला.

  • कौटुंबिक वादातून रक्तरंजित थरार.

रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या धाकटे वेणगाव येथून हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. पहाटेच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून काही अज्ञात हल्लेखोरांनी शिंदे कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हलल्यात शिंदे कुटुंबातील ४ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून तक्रारीच्या आधारे तपास सुरू आहे.

धाकटे वेणगावातील शिंदे कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी शिंदे कुटुंबाच्या घरी प्रवेश केला. पहाटेच्या सुमारास दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. चॉपर, कोयता आणि रिव्हॉल्व्हर घेऊन हल्लेखोरांनी शिंदे कुटुंबावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात प्रतिक शिंदे, सतिष शिंदे, प्रफुल्ल शिंदे आणि प्रतिभा शिंदे हे चौघे जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर शिंदे कुटुंबातील जखमी व्यक्तींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, किरण शिंदे, मंगेश जाधव, जय साबळे आणि इतर दोन अनोळखी तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर उल्हासनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कौटूंबीक वाद विकोपाला जाऊन झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे कुटुंबियांनी रोष व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

SCROLL FOR NEXT