Ajit Pawar Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: 'बजेटवरुन टीकास्त्र, भ्रष्टाचाराचे आरोप, अन् विकासाचा मुद्दा' अजित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका; विरोधकांना सुनावलं

Gangappa Pujari

मुंबई, ता. ४ जुलै २०२४

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली. राज्यातील प्रत्येक महिला स्वावलंबी व्हावी याच विचारातून ही योजना आणल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणालेत अजित पवार? वाचा.

काय म्हणालेत अजित पवार?

"काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडण्याचे भाग्य मला लाभले याचा मला अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात महिन्याला १५०० जमा केले जाणार आहेत. माता भगिणी सशक्त आणि स्वावलंबी होण्यासाठी ही योजना आहे," असे अजित पवार म्हणाले.

या "अर्थसंकल्पावर अनेक लोक अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून वाईट असल्याचं सांगितलं जातय. काहींनी लबाडाच्या घरच आवतान म्हणून हिणवलं जातय. मला इतकच सांगायच आहे की या लोकांमध्ये अन् अजित दादांमध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे अन् तुमचा दादा काम करणारा आहे. बजेटवर नाक मुरडणाऱ्यांचे चेहरे आजच बघून घ्या," असा टोला अजित पवार यांनी लगावला.

तसेच "मी राजकारणात आल्यापासून कोणता पक्ष बदलला नाही. पार्टी बदलली नाही. राजकारणात आल्यापासून जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जनतेच्या हिचाचाच विचार करतो. मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप झाले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. जो जास्त काम करतो त्याला जास्तीचा विरोध होतो," असेही अजित पवार या व्हिडिओमध्ये म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पंतप्रधान मोदींकडून फडणवीसांचं कौतुक!

Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध; राऊतांचा खळबळजनक दावा

Marathi News Live Updates : अमरावतीमध्ये २ दुचाकींचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Sitaram Dalvi Passed Away: शिवसेनेचा झुंझार शिलेदार हरपला! माजी आमदार सिताराम दळवी यांचे निधन

Heart Attack in Garba : गरबा खेळताना तुम्हालाही येऊ शकतो हार्टअटॅक; बचावासाठी 'या' स्टेप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT