Daylight burglary at sarpanch house in Yeola Nashik saam tv
महाराष्ट्र

सरपंचांच्या घरातून १२ तोळे सोनं चोरीला; महिला धुणी-भांडी करत असताना चोरट्यांचा डल्ला

Daylight Burglary At Sarpanch House In Yeola Nashik: नाशिकच्या येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे सरपंचांच्या घरी दिवसाढवळ्या घरफोडी. चोरट्यांनी अंदाजे १० ते १२ तोळे सोन्याचे दागिने आणि २ हजार रुपये रोख लंपास केले.

Omkar Sonawane

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे सरपंचांच्या घरी दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घरातील अंदाजे १० ते १२ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे २ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उंदीरवाडी येथील देशमुख वस्तीवर ही घटना घडली. स्नेहल रुषाल देशमुख (वय २७), त्यांच्या आई सिंधुबाई भास्कर सोनवणे आणि काकू कल्पना प्रदीप सोनवणे या घरात उपस्थित होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास एक फेरीवाला घराजवळून फिरून गेल्यानंतर काही वेळातच मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती घराजवळ आल्या. घरातील महिला पाठीमागील बाजूस धुणी-भांडी करण्यासाठी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली. त्यानंतर दोघांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील बॅगेत ठेवलेले तसेच कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. चोरी केल्यानंतर दोन्ही चोरटे मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान, उंदीरवाडीच्या सरपंच रुपाली तुळशीदास सोनवणे या गावातील दशक्रिया विधीसाठी गेल्या होत्या. घरातील महिला एकट्या असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरावर डल्ला मारल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच येवला तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध दिशेने तपास केला जात आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेता मयूर ठाकरेला अटक

Maharashtra : ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार! ६ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी; मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती

Supreme Court : रील करणारे कोण, पत्रकार कोण हेच समजत नाही; सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर

जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रक-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; अख्ख कुटुंब संपलं

SCROLL FOR NEXT