काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे आगमन
हवामान विभागाचा येलो अलर्ट १२ जिल्ह्यांमध्ये जारी
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यात उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असतानाच, आता हवामान खात्याने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. आजपासून राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडू शकतात. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे उकाडा कायम राहण्याची चिन्हे आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे.
पावसाचा हा अंदाज खरीप पिकांसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता असून, शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकतो. मात्र, विजांच्या कडकडाटामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून हवामानाच्या बदलत्या स्थितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पुणे ३०.७ २१.६
अहिल्यानगर ३३.० २२.६
धुळे ३४.० १९.६
जळगाव ३२.७ २३.७
जेऊर ३३.० १९.५
कोल्हापूर २९.१ २१.०
महाबळेश्वर २०.९ १७.३
मालेगाव ३२.० २१.४
नाशिक २८.७ २१.१
निफाड ३१.३ २०.१
सांगली २९.७ २१.३
सातारा ३०.६ २१.१
सोलापूर ३२.० २४.०
सांताक्रूझ ३१.० २६.५
डहाणू ३२.२ २४.८
रत्नागिरी २९.८ २४.२
छत्रपती संभाजीनगर ३२.४ २३.१
धाराशिव ३०.८ २१.८
परभणी ३२.४ २४.५
परभणी (कृषी) ३२.२ २३.०
अकोला ३४.० २५.०
अमरावती ३२.८ २२.७
भंडारा ३०.० २५.०
बुलडाणा ३०.८ २३.०
ब्रह्मपुरी ३४.४ २५.९
चंद्रपूर ३४.८ २५.०
गडचिरोली ३२.४ २४.६
गोंदिया ३३.४ २५.५
नागपूर ३४.४ २५.०
वर्धा ३४.० २५.४
वाशीम ३०.२ २३.०
यवतमाळ ३२.० २३.८
महाराष्ट्रात पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे?
सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने कोणता इशारा दिला आहे?
हवामान विभागाने वरील जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात उकाड्याची स्थिती कशी आहे?
अनेक भागांत ढगाळ वातावरण असून, पावसाअभावी उकाडा कायम आहे.
शेतकऱ्यांसाठी हा अंदाज कसा उपयुक्त आहे?
पावसामुळे खरीप पिकांना चालना मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.