ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात लोक त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेतात, कारण या हंगामात समस्या वाढण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात भिजल्यामुळे केसांत दुर्गंधी येऊ शकते; आज आम्ही त्यापासून मुक्त होण्याचे उपाय सांगणार आहोत.
केसांतील दुर्गंधी कमी करण्यासाठी दही आणि पुदिन्याचा हेअर पॅक वापरू शकता, ज्याने केस ताजेतवाने होतात.
दही लावल्याने केसांमधील दुर्गंधी निघून जाते आणि केस स्वच्छ व ताजेतवाने राहतात.
केसांवर दही आणि दालचिनीची पेस्ट लावून तुम्ही केसांची काळजी घेऊ शकता आणि ताजेपणा वाढवू शकता.
सफरचंद सायडर व्हिनेगरने केस धुतल्यास केसांतील दुर्गंधी कमी होते आणि केसांना ताजेपणा मिळतो.
केसांतील दुर्गंधी दूर करण्यासाठी कोरफडीचा रस लावल्याने केस ताजेतवाने आणि सुगंधित होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.