Monsoon Health Tips: तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? त्याआधी जाणून घ्या महत्त्वाचे उपाय

Dhanshri Shintre

पावसात भिजणं

पावसात भिजणं आनंददायक असलं तरी ते सर्दी, ताप आणि संसर्गासारख्या त्रासांचं कारण ठरू शकतं.

संसर्ग

पावसाळ्यात विचार न करता भिजल्याने सर्दी, ताप, त्वचा संसर्ग आणि इतर आरोग्य समस्या होण्याचा धोका वाढतो.

शरीराचे तापमान

पावसात भिजल्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होते आणि त्यामुळे ताप, सर्दी, विषाणूजन्य संसर्गाची शक्यता वाढते.

स्वच्छ कपडे घालणे

पावसात भिजल्यावर त्वचेचा संसर्ग आणि बुरशी टाळण्यासाठी लगेच स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे.

हळदीचे दूध

हर्बल टी, आले चहा आणि हळदीचे दूध शरीराला आतून गरम आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.

आंघोळ करणे

पावसाचे पाणी घाणेरडे असू शकते, त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी पावसात भिजल्यावर आंघोळ करणे गरजेचे आहे.

थंड पाणी आणि जोरदार वारा

थंड पाणी आणि जोरदार वारा शरीरातील कमकुवत भागांवर वेगाने विपरीत परिणाम करतात, त्यामुळे काळजी घ्यावी लागते.

आयुर्वेदिक औषध

तुळशी, आवळा, मध आणि ग्रीन टी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून हवामान बदलांपासून संरक्षण करतात.

पावसात भिजणे टाळा

आजारी असाल तर पावसात भिजणे टाळा, मुले व वृद्धांना विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे.

NEXT: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

येथे क्लिक करा