Dhanshri Shintre
पावसाळ्यात चेहऱ्याची त्वचा तेलकट होऊन पिंपल्सची समस्या वाढते. ती कमी करण्याचे उपाय जाणून घ्या.
दररोज त्वचा स्वच्छ ठेवल्यास मुरुमांची समस्या कमी होते; सौम्य क्लेंझर आणि टोनर वापरणे फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात मुरुम टाळण्यासाठी हलकं आणि दर्जेदार मॉइश्चरायझर वापरा, ज्यामुळे त्वचा मऊ, स्वच्छ आणि संतुलित राहते.
मुरुम कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार घ्या; फळे, हिरव्या भाज्या खाल्ल्यास त्वचेवर चमक येते आणि मुरुम कमी होतात.
चेहरा तजेलदार आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, यामुळे पिंपल्स कमी होण्यास नक्कीच मदत होते.
तणावामुळेही मुरुमे होऊ शकतात, म्हणून रोज योगा केल्यास तणाव कमी होतो आणि त्वचेवरील मुरुमांची समस्या कमी होते.
रात्री पुरेशी ७-८ तास झोप घेण्याने त्वचा ताजीतवानी राहते आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.