कौतुकास्पद|शेतकऱ्यांच्या विजेसाठी अभियंत्याचा धोकादायक प्रवास! संजय तुमराम
महाराष्ट्र

कौतुकास्पद|शेतकऱ्यांच्या विजेसाठी अभियंत्याचा धोकादायक प्रवास!

शेतकऱ्यांना तातडीने वीजपुरवठा मिळावा, यासाठी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी चक्क दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून रोहित्र नेत वीज पुरवठा अबाधित राखला आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : शेतकऱ्यांना तातडीने वीजपुरवठा Power supply मिळावा, यासाठी वीज वितरण कंपनीच्याCompany अभियंत्यांनीEngineer चक्क दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून रोहित्र नेत वीज पुरवठा अबाधित राखला. चंद्रपूरChandrapur जिल्ह्यातीलDistrict पोंभुर्णा Pombhurnaतालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या टोक (गंगापूर) या गावातील दोन कृषिपंप ग्राहकांचे कनेक्शनFarmers Connectio असलेल्या रोहित्रामध्ये नुकताच बिघाड झाल्याने त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या कृषि ग्राहकांसाठी जीवाची पर्वा न करता लाकडी नावेने wooden boat रोहित्र वाहून नेत त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत केला गेला.Dangerous journey of engineer for farmers' electricity!

या धाडसी कामासाठी महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी यांचे राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्विट करता अभिनंदन केले.

टोक गंगापूर या गावातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणने प्रयत्नांची शर्थ केली. थकबाकीमुक्त शेतकरी व महावितरणचे अभियंता कुणाल पाटील व तंत्रज्ञ यांनी सर्वांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे," अशी प्रतिक्रिया डॉ. राऊत यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये लिहिली आहे. 

हे देखील पहा-

टोक (गंगापूर) गावातील दोन कृषिपंप ग्राहक शांताबाई किसन दायले  व टेकलू नारायण कस्तुरे या दोन्ही ग्राहकांनी आपले थकीत वीज बिल ११ हजार ७३० रुपये महावितरण कार्यालयात भरले. पण रोहित्र लावण्यासाठी त्याठिकाणी जाण्यास कोणताही रस्ता नसल्याने व पोंभूर्णा ते जुनगाव असा ३० किलोमीटरचा कच्च्या रस्त्याचा खडतर मार्ग असल्याने शेवटी दुथडी वाहणाऱ्या  वैनगंगा नदीच्या पात्रातून लाकडी नावेतून नवीन २५ के.व्ही. क्षमतेचे रोहित्र डोंग्यामधून वाहून नेउन बिघडलेले रोहित्र तातडीने बदलण्यात आले. कृषिपंप  ग्राहकांचा  वीजपुरवठा पूर्वरत झाल्याने शेतकऱ्यांनी महावितरणप्रति कृतज्ञता व्यक्त  केली.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! जळता दिवा सोफ्यावर पडला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT