Bird Flu yandex
महाराष्ट्र

Bird Flu: बर्ड फ्लूचा धोका! लातूरच्या ढाळेगावात पोल्ट्री फार्ममधील ४२०० कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू

Latur Bird Flu: लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील पोल्ट्री फार्ममध्ये ४२०० बॉयलर कोंबड्यांच्या पिल्यांचा अचानक मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूच्या काळात कोंबडीचं मांस खाल्ल्याने मानवांमध्येही बर्ड फ्लूचा धोका होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिकन खाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुन्हा एकदा बर्ड फ्लूने आपल्या राज्यामध्ये शिरकाव केला आहे. बर्ड फ्लूच्या काळात कोंबडीचं मांस खाल्ल्याने मानवांमध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका असतो. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील पोल्ट्री फार्ममध्ये ४२०० बॉयलर कोंबड्यांच्या पिल्यांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कोंबड्यांच्या पिल्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

यापूर्वी, उदगीर येथे बर्ड फ्ल्यूमुळे १०० ते १५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती, आणि आता अहमदपूर तालुक्यातील ढाळेगावात कोंबड्यांच्या पिल्यांचा मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये व पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. अहमदपूर तालुक्यातील ढाळेगावमध्ये पोल्ट्री फार्मवरील ४२०० कोंबड्यांच्या पिल्यांचा अचानक मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची दखल घेत पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली.

कोंबड्यांच्या पिल्यांच्या मृत्यूचे कारण काय आहे, याचा तपास सुरू आहे. सॅम्पल्स पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत आणि त्यांचे परिणाम आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ढाळेगावमधील ही घटना, बर्ड फ्ल्यूच्या संकटाची पुनरावृत्ती होऊ शकते, ज्यामुळे पशुधन आणि कुक्कुट व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे, पशुपालक आणि स्थानिक प्रशासनाला अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे.

बर्ड फ्ल्यूच्या प्रसाराच्या चिंतेमुळे प्रशासनाने सखोल तपास सुरू केला आहे आणि येणाऱ्या दिवसात यासंदर्भातील अधिक माहिती समोर येईल. या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळण्यासाठी प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकारी सतर्क झाले आहेत, आणि या घटनेतून पुढे जाऊन बर्ड फ्ल्यू किंवा अन्य रोगांचा प्रसार होईल का, याबद्दल अधिक तपासणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT