मेळघाट मधील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी अरुण जोशी
महाराष्ट्र

मेळघाट मधील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

नदी, नाल्याकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती - शहरासह जिल्ह्यात संततधार पावसाचा Rain जबर तडाखा बसला असून, सर्वत्र हाहाकार उडाला आहे. ४८ तासांपासून पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सार्वत्रिक पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पूर्णा मध्यम प्रकल्पाचे सर्वच्या सर्व ९ दरवाजे, तर शहानूर मध्यम प्रकल्प व सापन धरणाचे Dam चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग जोरात असल्याने धरण परिसरासह नदी River, नाल्याकाठच्या तसेच सखल भागत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा Alert देण्यात आला आहे. 

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळ घाटातील नद्या या पावसामुळे दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. सिपना नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, मेळघाटातील सुमारे १०० गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने नदी, नाल्याकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कधी जोरात, तर कधी रिमझिम बरसणाऱ्या सरींमुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे.

हे देखील पहा -

सातपुडा पर्वतरांगात गुरुवारी झालेल्या पावसामुळे अचलपूर-बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक तीन तास विस्कळीत होती. पाण्यासाठी तहानलेल्या गडगा, सिपना, खंडू, खापरा या नद्या ओसंडून वाहत आहेत. मेळ घाटातील जवळपास १०० गावांचा संपर्क मुख्यालयासोबत तुटला आहे. सेमाडोह येथील भुतखोरा नाल्यासह हरिसाल, मांगिया या गावाजवळील नदीनाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. 

दिया गावाजवळ सिपना नदीच्या पुलावरून पाणी ओसांडून वाहत असल्यामुळे बैरागढ परिसरातील ५० गावे संपर्कहिन झाली आहे अमरावती जिल्ह्यात सरासरी २०.३ मिमी पाऊस पडला असुन चिखलदरा तालुक्यात ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America Shutdown: ट्रम्प यांना जोरदार धक्का; अमेरिकेत शटडाऊन, सरकारी काम ठप्प, पगारावरही संकट

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Veg Pulao: दसऱ्याला चमचमीत खावसं वाटतंय? झटपट करा हा हॉटेल स्टाईल चमचमीत पुलाव

Prakash Ambedkar : ओला दुष्काळ जाहीर करायला वेळ का?; दुष्काळाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर निशाणा

Mumbai Pune Missing Link: लोणावळा तलावाखालून जाणारा जगातील सर्वात रुंद बोगदा; मुंबई पुण्याला जोडणारा ड्रीम प्रोजेक्ट कधी सुरु होणार?

SCROLL FOR NEXT