Beed News
Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: वीज दुर्घटनेपासून वाचण्यासाठी दामिनी ॲपचा वापर करावा; अप्पती व्यवस्थान विभाकडून बीडकरांना आवाहन...

विनोद जिरे

Beed News: बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या एक दीड महिन्यापासून सतत अवकाळी पाऊस अन गारपिटीने धुमाकूळ घातला आहे. याच अवकाळी पावसाने शेत पिकांसह फळबागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या दरम्यान मराठवाड्यात विजा पडून जवळपास 25 लोकांचा मृत्यू झाला असून त्याचबरोबर 452 जनावरं दगावली आहे. (Latest Marathi News)

तर याच वीज दुर्घटनेपासून वाचण्यासाठी आणि आपल्या पशुधनाला वाचवण्यासाठी, शासनाकडून दामिनी नावाचे एक ॲप तयार करण्यात आलेले आहे. या दामिनी ॲपच्या माध्यमातून आपण आपले पशुधन व आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो. याच्यासाठ दामिनी ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करावं.असं आवाहन जिल्हा प्रशासनासह शासनाकडून करण्यात येत आहे. (Beed News)

दरम्यान दामिनी ॲप मिनिस्ट्री ऑफ सायन्सेस यांनी तयार केलेले आहे. विज पडण्याची माहिती मिळावी, याच्यासाठी हे शासनाने तयार केलेले आहे. IITM यांनी हे ॲप सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे व सर्वसामान्य नागरिकाकडे अँड्रॉइड मोबाइल (Mobile) आहे.

प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करावा. जेणेकरून ज्यावेळेस विजांचा कडकडाट होईल, त्यावेळेस वीज ही कोणत्या ठिकाणी पडणार आहे. याची माहिती तब्बल आपण आहोत त्या ठिकाणापासून 40 किलोमीटर अंतरापर्यंत मिळते.

त्याचबरोबर ही वीज किती वेळा नंतर पडणार आहे ? याची सुद्धा माहिती ह्या ॲपमध्ये दिलेली आहे, जेणेकरून शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांना आपलं जीवन सुरक्षित ठेवता येईल. असं आवाहन आपत्ती व्यवस्थापक राजदीप बनसोड यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddh Akapoor : श्रद्धाचा अस्सल रावडी स्वॅग

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

SCROLL FOR NEXT