Washim saam tv
महाराष्ट्र

Washim Crime News : वाशिम एलसीबीने १० दरोडेखोरांना पकडले; चारचाकीसह, १३ दुचाकी ७ मोबाईल हस्तगत

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले हाेते.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim Crime News : घातक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या १० दरोडेखोरांना दरोड्याच्या साहित्यासह जेरबंद करण्यात वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे. पाेलीसांनी दरोडेखोरांच्या ताब्यातून १ बोलेरो,१३ मोटार दुचाकी, ७ मोबाईल असा एकूण १३,०६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra News)

ग्राम पांगरी धनकुटे ते काटा रोड वरील रेल्वे पुलाच्या समोर काही जण संशयितरीत्या एक बोलेरो चारचाकी वाहन व काही दुचाकी घेऊन घातक शस्त्रांसह कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत दबा धरून बसले आहेत अशी माहिती २५ सप्टेबरला रात्री स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आली. तसेच घटनास्थळी कारवाई करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली.

त्या ठिकाणी दुचाकी व एक बोलेरो कारने रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या पडीक जागेमध्ये शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देश्याने दबा धरून बसले असल्याची खात्री झाल्याने पोलीस पथकांनी त्यांना घेराव घालून १० दरोडेखोरांना जागीच ताब्यात घेतले तर काही जण हे अंधाराचा फायदा घेऊन शेतशिवारात पळून गेले.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार विनोद मच्छिंद्र चव्हाण, वय ३० वर्षे, शुभम अनंता चव्हाण, वय २० वर्षे, आकाश नामदेव काकडे, वय २४ वर्षे, गौतम भगवान गायकवाड, वय ३८ वर्षे, संदीप मच्छिंद्र चव्हाण, वय ४० वर्षे (सर्व राहणार डव्हा, ता.मालेगाव, जि.वाशिम) तसेच राहुल विश्वास पवार, वय २२ वर्षे, रा.सुदी, ता.मालेगाव, जि.वाशिम, रवी डीगांबर पवार वय २८ वर्षे, रा.आमखेडा, ता.मालेगाव, जि.वाशिम, लक्ष्मण भागवत चव्हाण, वय ४९ वर्षे, रा.धारकाटा, ता.मालेगाव, जि.वाशिम, विशाल जगदीश पवार, वय २१ वर्षे, व राधेश्याम चुनिलाल पवार, वय २९ वर्षे (सर्व राहणार सावरगाव बर्डे, ता.मालेगाव, जि.वाशिम) अशी संशयित ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

त्यांच्याकडून लोखंडी कत्ता, धारदार चाकू, लोखंडी रॉड, लोखंडी कोयता, वेळूच्या काठ्या, मिर्ची पावडर मिळून आले तसेच चारचाकी गाडी बोलेरोची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाची दोरी, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर मिळून आले.

या दरोडेखोरांच्या ताब्यातून १ बोलेरो चारचाकी, १३ मोटार सायकली, ७ मोबाईल संच व वर नमूद साहित्य असा सुमारे 13 लाखांचा (१३,०६,५०० रुपयांचा) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दरोडेखोरांवर (कलम ३९९, ४०२ भादंवि सहकलम ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये) गुन्हा नोंदविण्यात आला आहे असेही पाेलीसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी गिफ्टसाठी हट्ट, मालकाकडून शिवीगाळ करत अमानुष मारहाण, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ

IRCTC New Rule: आता रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही; IRCTC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT