Vishwas Nangare Pati Saam TV
महाराष्ट्र

Vishwas Nangare Patil : IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने मेसेज आलाय, सावधान! स्वतःच दिली धक्कादायक माहिती

विश्वास नांगरे पाटील यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

सुरज सावंत

Crime News : सायबर क्राईमबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएस अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. स्वत: विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून याबाबतची माहिती दिली आहे. (Cyber crime)

मिळालेल्या माहितीनुसार, संबधित आरोपी हा विश्वास नांगरे पाटील असल्याचे भासवून लोकांशी चॅट करत आहे. याबाबत सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांची फेसबुक पोस्ट

नमस्कार मित्रांनो, काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावर बनावट खाते तयार केले आहे. ते माझ्या काही संपर्कांना खाली दिलेले संदेश पाठवत आहेत. मी तातडीने कायदेशीर कारवाई करत आहे. परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती सामायिक करू नका. कारण हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे! धन्यवाद...

सायबर क्राईमच्या (Cyber Crime) अनेक घटना घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांची टीम सातत्याने काम करत आहे. फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करुन दिवसेंदिवस ऑनलाइन गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात आता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्यासोबत देखील अशी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

SCROLL FOR NEXT