Rahuri Crime Update saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! चप्पल दुरूस्तीचे फक्त 20 रुपये मागितले, वृद्धाच्या जीवावर बेतलं

वांबोरी येथे क्षुल्लक कारणामुळं एका कामगाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

साम टिव्ही ब्युरो

राहुरी : वांबोरी येथे क्षुल्लक कारणामुळं एका कामगाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चप्पल दुरुस्तीच्या वीस रूपयाची मागणी करणाऱ्या चर्मकारावर एका ग्राहकाने खिळे ठोकण्याच्या लोखंडी बत्त्याने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळं चर्मकाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विलास नामदेव कांबळे (६५) असं हत्या झालेल्या चर्मकाराचं नाव आहे. याप्रकरणी (Police) राहुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून (culprit arrested) पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नगर तालुक्यातील मांजरसूंबा येथे राहणारा भाऊसाहेब किसन वाघमारे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. (Rahuri latest crime news update)

मिळालेल्या माहितीनुसार, वांबोरी येथे खडांबे नाक्याजवळ २० सप्टेंबरला सायंकाळी सव्वाचार वाजता आरोपी वाघमारे चप्पल दुरुस्तीसाठी गटई कामगार कांबळे यांच्याकडे गेला. काम झाल्यावर कांबळे यांनी चप्पल दुरुस्तीचे वीस रुपये मागितले. त्यानंतर वाघमारेने रागाच्या भरात खिळे ठोकण्याचा लोखंडी बत्ता उचलून कांबळे यांच्या डोक्यावर मारला.

त्यानंतर कांबळे यांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. पंरतु, काल गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT