Kolhapur News 
महाराष्ट्र

Kolhapur News: कप केकने घेतला जीव, विषबाधेमुळे सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू; कोल्हापूरातील धक्कादायक घटना

Kolhapur News: नातेवाईकांनी आणलेला कप केप खाल्ल्याने विषबाधा होऊन चिमगाव येथील बहिण-भावाचा मृत्यू झाला.

Dhanshri Shintre

कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगाव इथल्या सख्ख्या बहिण भावांचा काल सायंकाळी विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. श्रीयांश रणजीत आंगज वय वर्ष 5, आणि काव्य रणजीत आंगज वय वर्ष 8 अशी दोघांची नावे आहेत. कालपासून दोन्ही भावंडांना उलट्या आणि मळमळ असा त्रास जाणवत होता. मुरगुड आणि कोल्हापूर इथल्या खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार झालेत. पण त्यांनी उपचाराला योग्य प्रतिसाद दिला नसल्याने दोघांचीही प्राणज्योत मालावली. या घटनेची नोंद कोल्हापूर सीपीआर चौकीत झाली असून या दोघांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, चिमगाव कागल येथील रणजित आंगज, पत्नी व दोन मुलांसमवेत राहत होते. चिमगाव येथील रणजित नेताजी आंगज यांच्या घरी नातेवाईकांनी मुलांना खाण्यासाठी कप केक आणला होता. हा केक रणजित यांच्या मुलांनी खाल्ला. दोन दिवसांपासून त्यांचा लहान मुलगा आणि श्रीयांश आणि मुलगी काव्या यांना उलटी आणि मळमळ असा त्राय व्हयला लागला. श्रीयांश याला मुरगूडमधील खासगी दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी मुलाला तपासले आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

चिमगाव येथे त्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यानंतर मुलगी काव्याला देखील त्रास जाणवू लागला. तिला सुद्धा सायंकाळी मुरगूड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती, त्यामुळे तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयात देखील तिची प्रतिकृती खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेमध्ये या दोन्ही मुलांची आई यांना देखील काही प्रमाणावर मळमळ, उलटीचा त्रास जाणवत असल्याची माहिती आहे. चिमगावमधील श्रीयांश आणि काव्या यांच्या आकस्मिक मृत्यूने चिमगाववर शोककळा पसरली आहे. परिसरात या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT