Crime News Updates Saam Tv
महाराष्ट्र

चंद्रपूर : पोलिसांना चकवा देत तलावात मारली उडी, आरोपीनं केला आत्महत्येचा प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा पोलीस स्टेशनमध्ये (Rajura police station) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लाचखोर पोलिसानं गस्त घातलेल्या पोलिसांना चकवा देत पळ काढला. त्यानंतर त्या आरोपी पोलिसानं नगरपरिषदेच्या समोरील तलावात उडी मारुन (suicide attempt) आत्महत्येचा प्रयत्न केला. राजेश त्रिकोलवार असं आरोपीचं नाव आहे. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने तलावात जाऊन आरोपी राजेशला बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. या संपूर्ण घडामोडीमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) व स्थानिक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलिसांना ५० हजाराची लाच घेतांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक चमुच्या ताब्यात होते. बल्लारपूर येथील एका तक्रारकर्त्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दोन पोलीस कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार केली.

त्यानंतर नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील पानटपरीवर सापळा रचला. त्यात राजेश त्रिकोलवार ५२ व सुधान्शु मडावी ४५ वर्षे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ५० हजाराची लाच घेतांना अटक केली.

Edited By- Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabbage Cutlets Recipe : कोबीचं कुरकुरीत कटलेट, संध्याकाळच्या भुकेसाठी चटपटीत पदार्थ

पुणे-सातारा बंधाऱ्यावर कार कोसळली, पाहा थरारक व्हिडिओ

Shravan: श्रावणात साप नजरेस पडणं शुभ की अशुभ?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

KL Rahul Century : केएल राहुलचा इंग्लंडमध्ये कहर, लॉर्ड्सवर ठोकलं खणखणीत शतक

SCROLL FOR NEXT