Shruti Vilas Kadam
भारत सरकार प्रत्येक वर्षी गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करते आणि नंतर औपचारिक कार्यक्रमात राज्यपतींकडून सन्मान प्रदान केला जातो.
या वर्षी एकूण १३१ पद्म पुरस्कार जाहीर केले गेले असून त्यात पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री श्रेणीत विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींचा समावेश आहे.
या पद्म पुरस्कार यादीत मनोरंजनातील अनेक बड्या नावांचा समावेश आहे, ज्यात विविध भाषांतील चित्रपट, संगीत व कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान करणारे कलाकार आहेत.
महाराष्ट्रात संगमनेरचं नाव गाजवणारे ज्येष्ठ तमाशा कलवंत रुघुवीर खेडकर यांना देशातील सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
वर्ष २०२६ साठी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार यादीत दिग्गज अभिनेता धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या सिनेमात दिलेल्या असामान्य योगदानासाठी मरणोपरांत पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे. हा भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे.
दक्षिण भारतीय आणि मलयाळम सिनेमा क्षेत्रातील दिग्गज अभिनेते ममूटी यांचाही पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी असंख्य अभिनेते आणि कथानकांना नवा आयाम दिला आहे.
प्रख्यात गायिका अल्का याग्निक यांनाही त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या गाण्यांनी अनेक दशकांपासून श्रोत्यांची मने जिंकली आहेत.