Shruti Vilas Kadam
साडीवर स्लीक लो बन ही नेहमीच एलिगंट दिसणारी हेअरस्टाईल आहे. केस सरळ करून मागे घट्ट बांधा आणि थोडा हेअर जेल वापरा. ऑफिस, पूजा किंवा कार्यक्रमांसाठी ही परफेक्ट स्टाईल आहे.
केस एका बाजूला घेऊन साधी वेणी घातली तरी साडीवर खूप छान लूक येतो. कमी वेळेत होणारी आणि पारंपरिक लूक देणारी ही झटपट हेअरस्टाईल आहे.
केस नीट विंचरून मान खाली लो पोनीटेल बांधा. पुढचे काही केस मोकळे ठेवल्यास लूक अजून सॉफ्ट आणि ग्रेसफुल दिसतो.
साधा बन करून त्यावर गजरा लावल्यास लगेच सणासुदीचा लूक मिळतो. कमी मेहनतीत साडीवर परफेक्ट पारंपरिक हेअरस्टाईल तयार होते.
वरचे केस क्लच किंवा पिनने बांधा आणि खालचे केस मोकळे ठेवा. हलक्या साडीसोबत ही झटपट हेअरस्टाईल खूपच सुंदर दिसते.
समोरचे केस हलके कर्ल करून मागचे केस मोकळे ठेवा. हेअर स्ट्रेटनर किंवा कर्लरने ही स्टाईल ५–१० मिनिटांत तयार होते.
आधी वेणी घालून त्याचा जुडा बनवा. ही हेअरस्टाईल साडीवर स्टायलिश आणि एलिगंट दोन्ही लूक देते, तसेच पटकन तयार होते.