Maharashtra Garlic Price Saam Tv
महाराष्ट्र

Garlic Price: लसणाची फोडणी महागली; किरकोळ बाजारात दर थेट ४०० रुपयांवर

Maharashtra Garlic Price: सध्या पालेभाज्यांच्या किंमती असो किंवा लसणाच्या किंमती सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लसणाची फोडणी महागली आहे. किरकोळ बाजारात सध्या लसूणचा दर थेट 400 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे.येणाऱ्या पुढील सणासुदीच्या काळात हा भाव आणखी वाढून 600 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचू शकतो, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडणार हे नक्की.

सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लसणाची फोडणी महागली आहे. किरकोळ बाजारात(market) सध्या लसूणचा दर थेट ४०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे.येणाऱ्या पुढील सणासुदीच्या काळात हा भाव आणखी वाढून ६०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचू शकतो, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडणार हे नक्की.

लसणाला आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र,यंदा लसणाची आवक(income) कमी झाल्याने दर वाढतायत.जुन्या लसणाची आवक जवळपास संपली असून नवीन लसूण उपलब्ध नसल्याने सध्या बाजारात लसणाचे दर प्रचंड वाढलेले आहेत.यावर्षी देशातील लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत आहेत. आधीच महागाईने सर्वसामान्य नागरिक काटकसर करून आयुष्य जगत आहेत.

महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी एवढा महागडा (expensive)लसूण विकत घ्यायचा तरी कसा,असा प्रश्न सध्या सर्वसामान्याला सतावत आहे.दरम्यान,यापूर्वी जानेवारी महिन्यात सुद्धा लसणाच्या दरांचा मोठा भडका उडाला होता. वाढलेला भाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा ऑगस्टमध्ये भाव वाढले आहेत.बाजारात सध्या लसूण ४०० रुपयांनी किरकोळ बाजारात विकला जातोय.तर घाऊक बाजारात लसणाचा दर कमाल ३०० रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

लसूणच्या किंमती महाग झाल्यानंतर आता परत लसणाच्या किंमती कधी कमी होतील असा प्रश्न नागरिकांना भेडसावद आहे. जानेवारी महिना ते मे महिना या कालावधीत लसणाचे उत्पादन केले जाते. तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत आवक सुरळीत होते.या सर्वांचा परिणाम प्रत्येक नागरिकाला महागडा लसूण खावा लागणार आहे.मुख्यत महाराष्ट्रात(Maharashtra) मध्य प्रदेश,राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथून लसणाची आवक होत असते.भाव वाढत असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसणार ने निश्चित झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT