Hingoli News
Hingoli News saam Tv
महाराष्ट्र

Hingoli News: नुकसान दाखवण्यासाठी पैशाची मागणी; पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी घडवली अद्दल

संदीप नांगरे

Hingoli Crop Insurance News:

पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून दूर करण्यासाठी सरकार पीक विमा योजना राबवते. परंतु या योजनेच्या फायदा होण्याऐवजी शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून पिळवणूक जास्त होते. पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा खिसा भरावा लागत असल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आलाय. (Latest News)

शेतातील पीकांचे नुकसान दाखवण्यासाठी पैसे द्या, अशी मागणी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नियमबाह्य पैशांची मागणी करणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माळहिवरा गावातील ग्रामस्थांनी चांगलीच अद्दल घडवली. ग्रामस्थांना जेव्हा समजलं की, पैसे मागणं नियमबाह्य आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले. या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

विमा कंपनी कर्मचाऱ्यांनी हिंगोली तालुक्यातील माळहिवरा गावातील शेतकऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने पैसे वसूल केले. विमा कंपनी कर्मचाऱ्यांनी प्रति शेतकरी २०० रुपये उकाळले. जर पैसे दिले नाहीतर ते विम्याच्या अर्जावर जास्त नुकसान झाल्याचं दाखवत नसल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. यामुळे विम्या पैसे मिळणार नसल्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना पैसे दिल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिलीय.

याआधीही पीक विम्याच्या घोटाळ्याची प्रकरणे समोर आली होती. बीड जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे लाटल्याचा प्रकार समोर आला होता. बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून राज्यांतील 8 जिल्ह्यासह पर राज्यांतील शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचे तपासात उघडकीस आले होते. नगर परिषदेची, एमआयडीसीची, शासकीय गायरान जमीन, वन विभागाचे जमीन दाखवून तब्बल ३० हजार एकर क्षेत्राचा विमा भरल्याचे तपासात उघडकीस आले होते.

तर अकोला जिल्हात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यावर संबंधित यंत्रणेतील घटकांसह शेतकऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून विम्याचे पैसे लाटल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीत गावगुंडांचा ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला, एकास अटक

Mulund BJP | बघतोच आता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना थेट इशारा

Crime News: आयुर्वेदिक डॉक्टरकडून सुरु होता संतापजनक प्रकार! संभाजीनगरमधील खळबळजनक घटना नेमकी काय?

Gallstones News : पित्ताशयातील खडे कसे बरे होतात? वाचा डॉक्टरांनी सांगितलेले समज आणि गैरसमज

Special Report : छगन भुजबळ नाराज! महायुतीला टेंशन वाढवणार?

SCROLL FOR NEXT