राज्यातील औष्णिक विज केंद्रांमध्ये कोळसा टंचाईचे संकट Saam Tv
महाराष्ट्र

राज्यातील औष्णिक विज केंद्रांमध्ये कोळसा टंचाईचे संकट

दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले आहे. कोराडी येथील 1, खापरखेडा येथील 2 तर नाशिक मधील 1 युनिट बंद पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील 660 मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक 6 सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकतो.

हे देखील पहा -

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माेठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून अपेक्षित 18 रॅकऐवजी केवळ 10 रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज 25 रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु सध्या सरासरी 18 रॅक मिळत असल्यामुळे वीज केंद्रांमधील स्टॉक कमी होत चालला आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात वीज संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

कोकणात भाजपमध्ये मोठी 'इनकमिंग'; रवींद्र चव्हाणांचे पदाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

Traffic challan: गाडीवर जुना ई-चलान आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार दंड

Friday Horoscope: आज नात्यातील गैरसमज दूर होतील, हाती पैसाही येईल! वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT