बुलढाण्यातील 'त्या' घटनेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल... संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाण्यातील 'त्या' घटनेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल...

वरवट बकाल येथील मोबाईल शॉपी बळजबरीने बंद केल्याप्रकरणी दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: जिल्ह्यात काल लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. काही भागातील व्यवसायिकांनी दुकान बंद करण्यास मज्जाव केला. वरवंटबकाल येथे आंदोलनकर्त्यांनी दुकानदाराशी हुज्जत घातली, यात दुकानाचे शटर जबरदस्तीने बंद करण्यात आले, मात्र आत दुकानदार कोंडल्या गेला होता. त्याच धर्तीवर तामगाव पोलिसात तक्रार देण्यात आली. त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणेसह १५ कार्यकर्त्यांविरोधात तामगाव पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. (Crimes filed against Mahavikas Aghadi activists in 'that' incident in Buldhana)

हे देखील पहा -

वरवट बकाल येथील मोबाईल शॉपी बळजबरीने बंद केल्याप्रकरणी दुकानदाराने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे काल दि. १० रोजी संबंधित दुकानदाराने तामगाव पोलिसांना पत्र देऊन बंदचा विरोध करून संरक्षण मागितले होते. बंद दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बळजबरीने दुकान बंद करीत दुकान मालकाला कोंडून टाकले होते.

या सर्व आंदोलनकर्त्यांच्या विरोधात भा.द.वी. कलम १४३, १८८,२६९,२७०,५०४,१३५,३४२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेतय

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patole : देवेंद्र फडणवीस स्वत: निवडून येणार नाहीत; अमित शहांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Updates: मिरारोडमध्ये पोलिस ठाण्यात हाणामारी

Sambhaji Raje Chhatrapati : 'छत्रपती शिवरायांचे गुरु फक्त...'; अमित शहांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया

IND vs SA 1st T20I: पहिला टी-२० सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Election : महिला नेत्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली तर कठोर कारवाई; निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

SCROLL FOR NEXT