हल्लाबोल मिरवणुकप्रकरणी निर्दोष लोकांची सुटका करा 
महाराष्ट्र

हल्लाबोल प्रकरणातील निर्दोष भाविकांवरील गुन्हे परत घ्यावेत- रणजितसिंग कामठेकर

घटनेला सुमारे चार महिने उलटले आहेत. एकाही आरोपीची अद्याप न्यायालयातून सुटका झालेली नाही.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नांदेड : हल्ला- मोहल्लाच्या मिरवणुकीत ता. 29 मार्च रोजी झालेल्या प्रकारात सुमारे तीनशे ते चारशे भाविकांना संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संबोधले आहे. तसेच 77 जणांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वास्तविक पाहता काही उनाड प्रवृतीच्या तरुणांनी पोलिसांवर हल्ला केला, कोरोनाचे नियम तोडले, गाड्यांची नासधूस केली. परंतु पोलिसांनी अनेक निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत, ते गुन्हे परत घ्यावेत, अशी विनंती गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तथा दशमेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रणजितसिंघ कामठेकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

हल्ला- मोहल्लाच्या मिरवणुकीसाठी कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. त्याला गुरुद्वारा प्रशासन आणि पंचप्यारे साहेब यांनी सहमती दर्शवली होती. परंतु काही उत्साही तरुणांनी आमच्या धर्माच्या स्वातंत्र्यावर गदा आहे असे म्हणून कोणाचेही न ऐकता मिरवणूक काढण्यास भाग पाडले. त्यातील उनाड प्रवृत्तीच्या लोकांनी हिंसाचार केला. या हिंसाचाराचा नांदेड येथील शीख समाजाने निषेध केला आहे. पण तरीदेखील पोलिस विभागाने रागाच्या भरात निर्दोष भाविकांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवला, असे कामठेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - पावसाळ्यात मासिक पाळीदरम्यान होणारे इन्फेक्शन टाळायचे असेल तर...

सदर घटनेला सुमारे चार महिने उलटले आहेत. एकाही आरोपीची अद्याप न्यायालयातून सुटका झालेली नाही. गुरुद्वारा बोर्डाचे पदाधिकारी, अधिकारी व सदस्य यांच्यावरसुद्धा कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने गुरुद्वारा बोर्डाच्या कार्यात मरगळ आली आहे, असे कामठेकर यांनी नमूद केले आहे.

सचखंड गुरुद्वारा हे जागतिक स्तरावरील पवित्रस्थान आहे. याठिकाणी दरवर्षी देशविदेशातील लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु वरील प्रकरणामुळे भाविकांमध्ये संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत नाहीत. परिणामी नांदेड शहराचा आर्थिक व्यापार विस्कळीत झाला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण आणि प्रशासनाने त्या दिवशीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहून गुन्हेगार सोडून बाकी निर्दोष भाविकांवरील कलम 307 चे गुन्हे मागे घ्यावेत, अशी विनंती रणजितसिंघ कामठेकर यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT