Mangalvedha Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: महाराष्ट्र हादरला! एकाच घरातील ३ महिलांंची हत्या; धक्कादायक माहिती आली समोर

या महिलांची दगड आणि धारदार शस्त्राने हत्या झाली असून परिसरात खळबळ माजली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे...

Mangalvedha: एकाच घरातील तीन महिलांची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवेढा येथे घडली आहे. या भयंकर हत्याकांडाने सर्वत्र खळबळ माजली आहे.  मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलांची दगड आणि धारदार शस्त्राने हत्या झाली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Mangalvedha)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. दिपाली माळी, पारूबाई माळी, संगीता माळी अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत.

घराशेजारील समाधान लोहार या व्यक्तीने या तिन्ही महिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी समाधान लोहार या संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

मृत महिला या महादेव माळी यांच्या घरातील असून त्यांच्या दोन्ही बहिणी आणि सूनेची निर्घृण हत्या झाली आहे. दीपाली बाळू माळी (वय 25) ही महादेव माळी यांची सून आहे. तर पारूबाई बाबाजी माळी (वय 45), संगीता महादेव माळी (वय 50) या दोन बहिणी होत्या. या घटनेतील हल्लेखोराने इतकी निर्घृणपणे हत्या का केली असेल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT