Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News Saamtv
महाराष्ट्र

Bike Tyre Stolen: आता हद्दच झाली! गाडी चोरीला जावू नये म्हणून लॉक बसवले अन् चोरट्यांनी टायरचं पळवले

माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्याने दुचाकी चोरीच्या घटना वारंवार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुचाकी चोरीला जावू नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेतली असताना चोरांच्या प्रतापाने डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे नागरिक गाडी चोरीला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करतात. यासाठी नागरिकांनी गाडीला लॉक बसवून आपली दुचाकी चोरीला जावू नये म्हणून खबरदारी घेतली.

पण दुचाकी चोरीसाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नसल्याने चक्क दुचाकीचे चाक चोरून नेले आहे. छत्रपती संभाजी नगर शहरातील बीड बायपास रोडवरील अल्पाईन हॉस्पिटलसमोर ही घटना घडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने चिंतेत असताना आता गाडीचे पार्टही चोरी होत असल्याने संताप व्ययक्त केला जात आहे.

सदावर्तेंच्या ऑफिसमध्ये चोरी...

दरम्यान, राज्यभरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काल रात्री (१९, मार्च) वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील (Thane) वागळे इस्टेट परिसरातील गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून एसी, टीव्ही, वॉशिंग मशीनची चोरी करण्यात आली आहे. एकून 4 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र कोकणात

Raju Patil News : आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलेलो नाही, राजू पाटील यांचा महायुतीला इशारा?

Summer Skin Care: या घरगुती उपायांनी होईल काळी त्वचा गोरी

Heat Wave in Maharashtra : मे महिना 'ताप'दायक ठरणार, राज्यात उष्णतेची लाट येणार

Andheri Fire: ब्रेकिंग! अंधेरी पंप परिसरात भीषण अग्रितांडव; दारूचे दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT