Amritpal Singh : खलिस्तानी समर्थकांकडून तिरंग्याचा अपमान; उच्चायुक्त कार्यालयाबाहेर अमृतपाल सिंगच्या समर्थनात घोषणाबाजी

Khalistan News : पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ११२ जणांना अटक केली आहे.
Khalistani supporters
Khalistani supportersSaam TV

Amritpal Singh Arrest Operation : खलिस्तान चळवळीतील स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याला अटक झाल्यानंतर आता ब्रिटनमध्ये याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे.अमृतपाल विरोधात करण्यात आलेल्या कारवाईविरोधात भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने खलिस्तानी समर्थक जमा झाले. तसेच त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी खलिस्थानी समर्थकांकडून भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे. (Crime News)

Khalistani supporters
Shocking video : संतापजनक ! कुत्र्याचे पाय बांधून दुचाकीने दूरवर फरपटलं; क्रूर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय राजकारण तापण्याची शक्यता

एएनआय या वृत्तसंस्थेने सदर घटनेचा एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू असताना भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला आहे. जोरदार घोषणा देत काही आंदोलकांकडून समोर असलेला भारतीय राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला. या घटनेमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून राजकीय वतृळातही या घटनेमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शनिवारी रात्री पोलिसांनी अमृतपालसह त्याच्या समर्थकांवर मोठी कारवाई केली आहे. यावेळी अमृतपालचे काका आणि त्याचा ड्रायव्हर दोघे स्वत:पोलिसांसमोर आले. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अमृतपाल सिंगला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांची शोधमोहीम वेगाने सुरू आहे.

आतापर्यंत ११२ जणांना अटक

अमृतपाल सिंग आणि खलिस्तान चळवळीतील समर्थकांविरोधात १८ मार्चपासून कारवाई सुरू झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी हे काम असेच सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ११२ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर ७ अवैध शस्त्रे, ३०० हून अधिक गोळ्या आणि ३ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. यामुळे पाकिस्तान-आयएसआयशी असलेले संबंधही समोर आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com