Beed Crime News  saam tv
महाराष्ट्र

Crime News: संतापजनक! शेतमालकाच्या 8 वर्षीय चिमुकलीवर सालगड्याकडून अत्याचार; गुडीपाडव्याच्या दिवशीच केले क्रूर कृत्य

Beed Crime News Update: गुढीपाडव्याच्या दिवशीच घडलेल्या या संतापजनक घटनेने परिसरात खळबळ माजली असून नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>>विनोद जरे...

Beed News: शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराने शेतमालकाच्या 8 वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुढी पाडव्याच्या दिवशीच केज तालुक्यात ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यामध्ये गुढी पाडव्याचा उत्साह सुरू असतानाच संतापजनक घटना समोर आली आहे. गुढी पाडव्याच्या दिवशीचं नराधम आरोपी सालगड्याने, शेतात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत, शेतमालकाच्याच 8 वर्षीय चिमुकलीला गोठ्यापासून काही अंतरावर असलेल्या शेतात नेले. व तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

सायंकाळी आईला पाहून पीडित मुलगी रडू लागली. यावर रडायला काय झाले ? असे आईने विचारले. यावेळी मुलीने सालगड्याने केलेल्या अत्याचाराची हकीकत सांगितली. मुलीच्या आईने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात नराधम आरोपी सालगड्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळचा लातूर (Latur) जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या या नराधम आरोपीला केज पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. या संतापजनक प्रकाराने परिसरात खळबळ माजली असून नराधमाला कठोर शिक्षेची मागणी होत आहे. (Beed News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol: आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तीच राजकीय फूट; शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद, वाचा सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra News Live Update: आमदार राजेश पाडवी यांनी नाशिकमध्ये घेतली आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

SCROLL FOR NEXT