Crime : विहिरीत मृतावस्थेत आढळला युवक-युवतीचा मृतदेह! घातपात की आत्‍महत्‍या? संजय जाधव
महाराष्ट्र

Crime : विहिरीत मृतावस्थेत आढळला युवक-युवतीचा मृतदेह! घातपात की आत्‍महत्‍या?

या दोघांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चा गावात दबक्या आवाजात सुरु आहेत. मात्र, या दोघांची ही आत्महत्या आहे की, घातपात आहे? याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवक युवतीचा मृतदेह काल सायंकाळी पिंपळगाव राजा गावाच्या बाहेर एका विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडालीये. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय कारवाई साठी पाठवले आहेर. मात्र, या दोघांची ही आत्महत्या आहे, की घातपात आहे, याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे. तर, या दोघांचे प्रेम संबंध असल्याच्या चर्चा गावात दबक्या आवाजात सुरु आहेत.

हे देखील पहा :

खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील प्रमोद ऊर्फ सुरेश भांबळकर आणि दुर्गा सावरकर हे दोघेही 11 ऑक्टोबरपासून घरून बेपत्ता होते. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दोघेही हरविल्याची नोंद सुध्दा करण्यात आली होती. त्‍या दोघांचा शोध सुरू असताना काल सायंकाळी पिंपळगाव राजा येथील शेतकरी विठ्ठल पाटील हे शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत तरुण-तरुणीचे मृतदेह तरंगताना दिसले. यावेळी त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. यावेळी मात्र, ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तर, विहिरीच्या बाजूला एक दुचाकी सुद्धा अपघातग्रस्त अवस्थेत आढळल्याने या प्रकरणाचे गौडबंगाल वाढले असून, हा घातपात की आत्महत्या?  हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासणी नंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला अंघोळ करताना करा हा १ उपाय, या समस्यांपासून मिळेल सुटका

LPG Shortage : नेत्याच्या हॉटेलमध्ये आढळले तब्बल ८८ LPG सिलिंडर, पोलिसांनी ५ जणांविरोधात केली कारवाई

Maharashtra Live News Update : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद काम

Breaking News: खासदारासह ११ जणांना पोलिसांकडून अटक, पार्टीमध्ये ड्रग्ज घेताना पकडलं

सहकारी बँकांच्या राजकारणात उलथापालथ होणार, सहकार मंत्रालयाच्या आदेशानं खळबळ

SCROLL FOR NEXT