covid19  
महाराष्ट्र

सलग दुस-या दिवशी 28 काेराेनाबाधितांचा मृत्यू; सर्वाधिक साता-यात

Siddharth Latkar

सातारा : सातारा जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी सहाशे पेक्षा अधिक नागरिकांना काेविड १९ covid19 ची लागण झाल्याचे समाेर आले आहे. याबराेबरच सलग दुस-या दिवशी २८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यासह काेल्हापूर, सांगली येथील रुग्णसंख्या कमी हाेत नसल्याचे चित्र आहे. सांगली येथील दाै-यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्याविषयी चिंता व्यक्त करुन नागरिकांना मास्कचा वापर करा असे आवाहन केले.

सातारा जिल्ह्यात गत २४ तासांत ६१८ नागरिकांना काेविड १९ ची बाधा झाली तसेच २८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 19 (9415), कराड 136 (35348), खंडाळा 21 (13191), खटाव 61 (21938), कोरेगांव 62 (19273), माण 30 (14992), महाबळेश्वर 1 (4533) पाटण 19 (9619), फलटण 113 (31318), सातारा 112 (45807), वाई 35 (14459) व इतर 9 (1672) असे आज अखेर एकूण 221565 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

सर्वाधिक मृत्य साता-यात

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (201), कराड 11 (1054), खंडाळा 1 (170), खटाव 2 (522), कोरेगांव 1 (415), माण 1 (305), महाबळेश्वर 0 (87), पाटण 1 (336), फलटण 4 (536), सातारा 5 (1347), वाई 1 (331) व इतर 0 (73) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5377 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

1253 जणांना दिला डिस्चार्ज

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1253 जणांना मंगळवारी घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grahan In Pitru Paksha: पितृ पक्षात चंद्र-सूर्य ग्रहणाचा होणार अद्भुत संयोग; 4 राशींना मिळणार मनाजोग्या गोष्टी

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT