सातारा : महाराष्ट्रातील काेराेनाबाधितांची संख्या घटत असली तरी सातारा, सांगली, काेल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील रुग्ण संख्या काही केल्या कमी झाली नाही असे चित्र जूलै महिन्यांतील रुग्ण संख्येने समाेर आले आहे. कडक निर्बंधांपलीकडे तपासण्या वाढविल्या तरी रुग्ण संख्या विशेषतः सातारा, सांगली, काेल्हापूरची आटाेक्यात का येत नाही याबाबत प्रशासनाला देखील ठाेस असे काही सांगता येत नाही. दरम्यान काेविड १९ covid19 चा प्रादुर्भाव राेखण्यासाठी खूद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संक्रमीत जिल्ह्यांमध्ये तपासणी वाढवा अशा सूचना दिल्या आहेत.
एकीकडे काेराेना corona आणि दूसरीकडे महापूर या दुहेरी संकटात काेल्हापूर, सांगलीचे नागरिक सापडले . कृष्णा कारखाना निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यात देखील काेविड १९ च्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध कायम राहिले आहेत. गेल्या चार दिवसांत हजाराेत येणारी रुग्ण संख्या सातारा जिल्ह्यात साडे सहाशेपर्यंत आली असली तरी व्यावसायिकांना नियमातून दिलासा मिळालेला नाही.
राज्यात संपूर्ण जुलै महिन्यात कोविड १९ च्या रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली. परंतु राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मात्र अपेक्षित घट दिसली नाही. राज्यात जवळजवळ संपूर्ण जूलै महिन्यात दररोज सात ते नऊ हजार इतकी रुग्ण संख्या आढळून येत हाेती. केवळ हाताच्या बाेटावर माेजण्याइतपतच काेराेनाबाधितांची संख्या सहा हजार पर्यंत आली.
राज्यातील सातारा satara, सांगली sangli, कोल्हापूर kolhapur आणि पुणे pune या चार जिल्ह्यांत महाराष्ट्रातील रुग्ण संख्येपेक्षा ५० टक्के जात रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सातारा आणि सांगली हे दाेन जिल्हे राज्यात सर्वाधिक काेविड १९ ने ग्रासल्याचे दिसून आले आहे.
एक ते सात जुलै तारखेपर्यंत या चार जिल्ह्यांत महाराष्ट्राच्या एकूण रुग्ण संख्येपेक्षा ५४ टक्के रुग्णसंख्या हाेती. सात ते १४ जुलै पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण कोविड आकडेवारीत या जिल्ह्यांत पुन्हा ५३ टक्के, १५ ते २१ जुलै दरम्यान ५५ टक्के, २२ ते २८ जुलै पर्यंत 49 टक्के आणि २९ ते ३१ जुलै पर्यंत पुन्हा ४९ टक्के रुग्णसंख्या आढळून आली.
यामुळे संपूर्ण जुलै महिन्यात कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे यांनी महाराष्ट्राच्या एकूण कोविड रुग्णसंखया ५२.६ टक्के इतकी हाेती. ही संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने अधिक राहिली. यामुळे खूद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या सांगली जिल्ह्याच्या दाै-यात चिंता व्यक्त केली.
या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्येत लक्षणीय घट का हाेत नाही याचे ठाेस उत्तर प्रशासनाकडे देखील नाही. राज्याचे आराेग्यमंत्री राजेश टाेपेंनी ज्या जिल्ह्यात पाॅझिटिव्हीटीचा दर जादा आहे तेथे कठोर निर्बंध लावल्याचे नमूद केले. रुग्ण संख्या आटाेक्यात आणण्यासाठी विशेषत: पूरग्रस्त भागात अधिकाऱ्यांना कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन हाेते की नाही. तसेच स्थलांतर करताना काेराेनाचे संक्रमण हाेणार नाही याची काळजी घेण्याचे सूचित केल्याचे सांगतिले. याबराेबरच लसीकरण केले जात असल्याचे नमूद केले. चाचणी वाढवून रुग्ण संख्या आटाेक्यात येईल असा विश्वास टाेपेंनी व्यक्त केला आहे.
सातारा आणि पुण्यासारख्या भागांत दैनंदिन प्रवास करणा-यांची संख्या जास्त आहे. या स्थलांतरामुळे रुग्ण संख्येत कमी जास्त प्रमाण हाेत असते. पुणे, सातारा आणि कोल्हापूरातील लोकसंख्या पाहता ही घट लक्षणीय नाही हे खरं असले तरी लाेकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यातील वाढलेले संक्रमण आत्ता कमी हाेउ लागले असले तरी पूर आणि दुर्घटनाग्रस्त भागात पुन्हा रुग्ण संख्या वाढती की काय अशी भिती निर्माण झाली आहे. जुलैच्या अखेरीस आलेल्या पूरांमुळे रुग्ण संख्येत थोडी घट झाली आहे. एकट्या साताऱ्यातही पूर दरम्यान दररोज सुमारे पाच हजार चाचण्या कमी झाल्या आहेत.
सांगली प्रशासनाच्या मते जिल्ह्याने उर्वरित महाराष्ट्रानंतर अनेक आठवड्यांनंतर दुसऱ्या -लाटाचे सामना केला. त्यामुळे येथील लाट कमी हाेण्यास विलंब झाला. परिणामी रुग्ण संख्या घटली नाही. यापुर्वी देखील आम्ही तपासण्या वाढविल्या हाेत्या. आत्ता देखील त्याची संख्या वाढविली आहे. त्याचा निश्चित परिणाम दिसून येईल.
या चार जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांपेक्षा आर्थिक घडामोडी म्हणजे व्यवहार जास्त हाेत असतात. त्यामुळे लाेकांचे येणं जाणं वाढते. त्यामुळे कोविड १९ रुग्ण संख्येत वाढ झाली असा ही निष्कर्ष काढला जात आहे.
satara--sangli-kolhapur-pune-contributed-52-percent-of-maharashtra-total-covid-cases-in-july-sml80
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.