Maharashtra Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: चिंताजनक! राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव; कोकणात JN.१ व्हेरिएंटचा आढळला पहिला रुग्ण

Maharashtra Corona Update: कोरोनाच्या JN.1 या व्हेरिएंटने राज्यातही शिरकाव केला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात JN.१ या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. यामुळे आरोग्य प्रशासन अलर्ट झालं आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Corona In Maharashtra:

जगभरातील बहुतेक देशात कोरोनाचा नव्या व्हेरिएंटने एंट्री केली आहे. याच कोरोनाच्या JN.1 या व्हेरिएंटने राज्यातही शिरकाव केला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात JN.१ या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गातील ४१ वर्षीय पुरुषाला या व्हेरिएंटची लागण झाली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासन अलर्ट झालं आहे. (Latest Marathi News)

सिंधुदुर्गात आढळला नव्या व्हेरिएंटचा रुग्ण

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने एंट्री केल्याने लोकांची चिंता वाढवली आहे. देशात JN.१ या व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्याचे दिसून येत आहे. JN.1 व्हेरिएंट ओमिक्रॉन व्हेरिएंटचा उपप्रकार आहे. यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे.

राज्यातील सिंधुदुर्गात ४१ वर्षीय पुरूषाला JN.1 व्हेरिएंटची लागण झाली आहे. या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे कळविले आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क

कोरोनाच्या व्हेरिएंटच्या एंट्री केल्याने सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे इत्यादी सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचे कळविण्यात आले आहे.

तसेच रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या आय.एल.आय आणि सारी रुग्णांच्या कोविड चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने राज्यामध्ये कोविड पूर्व तयारी करण्यात आल्याची माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील स्थिती काय?

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यात सद्यस्थितीत ऑक्सिजनची उपलब्धता करण्यात आली आहे. राज्यात सध्या बेड्स २३ हजार २९५ आहेत. तर ऑक्सिजन बेड्स ३३ हजार ४०४ इतके आहेत. आयसीयू बेड्सची संख्या ९ हजार ५२१ इतकी आहे. व्हेंटीलेटर बेड्स ६ हजार ३ एवढे आहेत. याचबरोबर राज्यात एकूण २३ हजार ७०१ डॉक्टर उपलब्ध आहेत. कोविड संदर्भातील प्रशिक्षित डॉक्टर्स २२ हजार ३३० इतके आहेत.

राज्यात एकूण आरोग्य कर्मचारी किती?

नर्सेस २५ हजार ५९७

प्रशिक्षित नर्सेस २२ हजार ३२४

आरोग्य कर्मचारी १० हजार २३६

प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी ९ हजार १०१

आरटीपीसीआर कीट्स ३ लाख २६ हजार २८०

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : अणुशक्ती नगर मधून सना मलिक पिछाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT