covid 19  
महाराष्ट्र

काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

Siddharth Latkar

मुंबई : आगामी काळात साजरा केल्या गणेशाेत्सवानंतर राज्यातील सात जिल्ह्यांना विशेष सावधगिरी बाळगावी लागणार असल्याची आवश्यकता आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज (रविवार) व्यक्त केली.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या covid 19 third wave उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलातर्फे covid task force आयोजित माझा डॉक्टर या ई-वैद्यकीय परिषदेत डाॅ. व्यास बाेलत हाेते. त्यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ई- वैद्यकीय परिषदेचे उदघटान झाले. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणातून तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर काय करावे याबाबत जनतेस मार्गदर्शन केले.

दरम्यान डाॅ. प्रदीप व्यास यांनी उपस्थितांना महाराष्ट्रातील काेविड १९ च्या रुग्णांची प्रारंभाची आणि सद्यस्थिती, दैनंदिन चाचण्या, लसीकरणाची स्थिती तसेच रुग्णवाढीचा दर, डेंग्यू, मलेरिया यासह म्युकरमायकाेसिस रुग्णांची संख्येबाबतची माहिती दिली.

डाॅ. व्यास म्हणाले पुणे, ठाणे, सातारा, नगर आणि मुंबई या महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत ७२ टक्के काेविड १९ चे सक्रिय रुग्ण सक्रिय आहेत. त्याशिवाय गेल्या आठवड्यापासून (ता.२९, ऑगस्ट) पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाॅझिटीव्हीटीचा दर वाढू लागला आहे. आगामी काळात साजरा केल्या गणेशाेत्सवानंतर या जिल्ह्यांना विशेष सावधगिरी बाळगावी लागणार असल्याची आवश्यकता डाॅ. व्यास यांनी व्यक्त केली आहे.

काेराेनाचा प्रादुर्भावास नऊ मार्च २०२० प्रारंभ झाला. गतवर्षी १९ सप्टेंबरला राज्यात सर्वाधिक २४ हजार ८८६ रुग्ण नाेंदविले गेले. दुसऱ्या लाटेदरम्यान १८ एप्रिल २०२१ कालावधीत सर्वाधिक एक दिवस स्पाइक ६८ हजार ६३१ इतका होता.

१७ सप्टेंबर २०२० ला पहिल्या लाटेदरम्यान सर्वाधिक सक्रिय रुग्ण संख्या तीन लाख ९ हजार ७५२ इतकी होती आणि दुसऱ्या लाटेदरम्यान २२ एप्रिल २०२१ कालावधीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण संख्या सहा लाख ९९ हजार ८५८ इतकी होती.

शनिवारी (ता.४ सप्टेंबर) राज्यात सक्रिय रुग्ण संख्या ५२ हजार ०२५ नाेंदवली गेली आणि एकदिवसीय वाढ चार हजार १३० इतकी झाली. गेल्या १५ दिवसांत दररोज आणि सक्रिय रुग्ण संख्येत कोणतीही घट झालेली नसल्याचे आराेग्य विभागाने नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : गोव्यात लपलाय पांढराशुभ्र धबधबा, सौंदर्य पाहाल तर हरवून जाल

Maharashtra Live News Update: नांदेडचे विमानतळ पुन्हा सुरू होणार

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT