Court saam tv
महाराष्ट्र

Akola News : चिठ्ठीवर मोबाईल नंबर पाठवणे युवकाला पडले महागात, सक्त मजुरीची शिक्षा

पवन त्रंबक इंगळे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Jayesh गावंडे

>> जयेश गावंडे

अकोला : एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देऊन त्यावर मोबाइल नंबर लिहिणाऱ्या युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी आरोपी युवकाला दोषी ठरवत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पवन त्रंबक इंगळे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Akola News)

31 मार्च 2020 रोजी पीडित मुलगी तिच्या घरी होती. यावेळी आरोपी हा तिच्या घरी गेला आणि त्याने तिला चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीवर त्याने त्याचा मोबाईल नंबर लिहला होता व तिला फोन करण्यास सांगितले होते. त्यानंतर आरोपी हा पीडितेला वाईट नजरेने पाहत असे. अखेर मुलीने तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर मुलीची आई ही आरोपीला समजावण्यासाठी त्याच्या घरी गेली होती.

मात्र आरोपीने तिच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडित मुलगी व तिची आई दोघींनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीविरूद्ध अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षपुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पवन त्रंबक इंगळे याला कलम 354 नुसार तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कारावास, पोक्सो कलम 11,12 मध्ये तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कारावास, सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

SCROLL FOR NEXT