Raj Thackeary, Sangli, Shirala Court saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeary News : राज ठाकरेंना दिलासा, 'या' अटीवर अजामीनपात्र वाॅरंट रद्द

या आंदोलनाचा खटला शिराळा न्यायालयात गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे.

विजय पाटील

Raj Thackeary Latest Marathi News : शिराळा (shirala) येथील खटल्यात राज ठाकरे (Raj Thackeary) यांचा अजामीनपात्र वॉरंटचा हुकूम रद्द झाला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणीस हजर राहण्याच्या अटीवर हे वॉरंट (warrant) रद्द झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. या खटल्यातील अन्य आठ जणांवर अजामीनपात्र वॉरंटचा हुकूम बजावण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला हाेणार आहे.

मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाली म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगली जिल्ह्यातल्या शेडगेवाडी येथे २००८ मध्ये आंदोलन (aandolan) केले होते. या आंदोलनाचा खटला शिराळा न्यायालयात गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. (Breaking Marathi News)

सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे राज ठाकरे, शिरीष पारकर यांच्यासह अन्य संशयित आरोपींना न्यायालयाने अटक वॉरंट बजावले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह दहा जणांनी सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्याचा विनंती न्यायालयात (court) केली होती.

न्यायालयाने राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांचा अजामीनपात्र वॉरंटचा हुकूम रद्द केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणीस हजर राहण्याच्या अटीवर अटक (arrest) वॉरंट रद्द करण्यात आले आहे. मात्र अन्य आठ जणांना अजामीनपात्र वॉरंटचा हुकूम काढला आहे. पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला हाेणार आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT