Shubhangi Patil News: नाॅटरिचेबल शुभांगी पाटील अचानक अवतरल्या अन् घडाघडा बाेलल्या; काय वेळ आणेल ते...

Graduate Constituency Election: आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हाेता.
Shubhangi Patil, Satyajeet Tambe
Shubhangi Patil, Satyajeet Tambe saam tv
Published On

- तबरेज शेख

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर निवडणुक लढविणारच अशी गर्जना आज शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी माध्यमांसमाेर केली. पाटील यांची लढत युवा नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्याशी हाेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पक्ष हितासाठी भाजपचे नेते धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी त्यांचा अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पदवीधर मतदार संघ निवडणुकीत (election) सोळा उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. सहा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Shubhangi Patil, Satyajeet Tambe
Graduate Constituency Election : पक्ष सांगेल त्याचे काम करणार ! भाजप नेत्याची पदवीधर निवडणुकीतून माघार

नाशिक पदवीधर निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आज सकाळपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने पाठींबा दिलेल्या शुभांगी पाटील यांचा फाेन लागत नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात हाेते. पाटील या त्यांचा अर्ज मागे घेणार अशी चर्चा समाज माध्यमातून पसरली. (Breaking Marathi News)

Shubhangi Patil, Satyajeet Tambe
Teachers Constituency Election : कडूंच्या खेळीमुळे ज्ञानेश्वर म्हात्रेंचा मार्ग सुकर, बाळाराम पाटलांना संघर्ष

दरम्यान दुपारच्या सुमारास अचानक शुभांगी पाटील या नाशिकच्या महसूल कार्यालयात पाेहचल्या. त्यावेळी त्यांना माध्यमांनी घेरले. त्यानंतर पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर दिले. मी फोटो बदलायला आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मी माझ्या उमेदवारीवर ठाम असून निवडणूक लढणारच असे स्पष्ट केले.

Shubhangi Patil, Satyajeet Tambe
Cotton Price Per Quintal : कापसाचा दर वाढला, उत्पादकांत चैतन्य; जाणून घ्या प्रतिक्विंटलला मिळणारा भाव

माझ्यावर कुणाचा दबाव नाही. वेळ आल्यावर मी सगळं सांगेल. माझा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा प्रश्नच नाही असेही शुभांगी पाटील यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या शेवटी राजकारण आहे. काय वेळ आणेल ते राजकारण्यांनाच (politician) माहिती. काही तरी असल्याशिवाय माणूस नाॅटरिचेबल असताे हे तुम्हांला देखील माहिती आहे.

Shubhangi Patil, Satyajeet Tambe
Ravikant Tupkar: कापसाला 'हा' भाव द्या, अन्यथा आंदाेलनास सामाेरे जा : रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

मी महाराष्ट्रातील एकमेव महिला (women) उमेदवार आहे. सर्व पक्षांना (मविआ) मी पाठींबा मागितला आहे. माझा सर्व पक्षातील श्रेष्ठींवर विश्वास आहे. सर्वजण मला नक्की पाठींबा देतील असेही पाटील यांनी नमूद केले. गिरीश महाजन यांनी तुमच्याशी संपर्क साधाला का ? त्यावर पाटील यांनी याविषयी मी न बाेललेच बरं असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com